शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...मग तेव्हाच शिवसेनेनं आक्षेप का घेतला नाही?; अखेर अमित शहा उतरले रणांगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 19:31 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी भाष्य केलं आहे. महायुतीची सत्ता आल्यास देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असं मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा जाहीर सभेत म्हटलं होतं. मात्र त्यावेळी कोणीही त्याबद्दल आक्षेप का नोंदवला नाही, असा प्रश्न शहांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचारला आहे. मुख्यमंत्रिपदाबद्दल त्यावेळी काहीच न बोलणारे आता नव्या मागण्या घेऊन येत आहेत. मात्र त्या आम्हाला अमान्य आहेत, असं शहा म्हणाले आहेत. त्यामुळे युतीमध्ये निर्माण झालेली दरी आणखी रुंदावण्याची शक्यता आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याची मागणी शिवसेनेकडून निवडणूक निकालानंतर करण्यात आली. यानंतर शिवसेना, भाजपामधील वाद विकोपाला गेला. मात्र तसं कोणतंही आश्वासन शिवसेनेला देण्यात आलं नव्हतं, असं स्पष्टीकरण अमित शहांनी दिलं. एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शहांनी महाराष्ट्रात निर्माण झालेल्या अभूतपूर्व राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींसह देवेंद्र फडणवीस यांनीदेखील अनेकदा मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा प्रचारसभांमध्ये उपस्थित केला. पुढचे मुख्यमंत्री फडणवीसच असतील, असं मी आणि मोदींनी जाहीरपणे म्हटलं होतं. मुख्यमंत्रिपदावर आता दावा करणाऱ्यांनी त्यावेळी यावर कोणताही आक्षेप का घेतला नाही, असा सवाल शहांनी उपस्थित केला.  राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी शिवसेना, राष्ट्रवादीला बहुमताचा दावा करण्यासाठी कमी कालावधी दिला, असा आरोप दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. त्यावर भाष्य करताना याआधी कोणत्याही राज्यात राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी १८ दिवस दिले नव्हते, असं शहा म्हणाले. विधानसभेचा कालावधी संपताच राज्यपालांनी बहुमताचा दावा करण्यासाठी पक्षांना निमंत्रण दिलं. मात्र ना शिवसेना बहुमताचा दावा करू शकली ना काँग्रेस-राष्ट्रवादी. आताही कोणत्याही पक्षाकडे बहुमत असल्यास ते राष्ट्रपतींकडे जाऊ शकतात, असं शहा यांनी म्हटलं. राज्यपालांनी कोणालाही संधी नाकारली नाही. त्यामुळे कपिल सिब्बल यांच्यासारख्या ज्येष्ठ वकिलाचा दावा हास्यास्पद वाटतो, असं शहा म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Amit Shahअमित शहाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार