शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

महाराष्ट्र निवडणूक 2019: विश्वास म्हणजे काय रे भाऊ?; भाजपाकडून शिवसेनेला 'डोस'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 9:59 PM

हॉटेलमधील आमदारांच्या मुक्कामावरुन शिवसेनेला भाजपाचा टोला

मुंबई: मुख्यमंत्रिपदाची मागणी लावून धरलेल्या आणि त्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेसशी आघाडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसेनेला आता भाजपानं टोला हाणला आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेनं हरतऱ्हेचे प्रयत्न केले. मात्र २४ तासांत त्यांना राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात अपयश आलं. आपले आमदार फुटू नये यासाठी शिवसेनेनं बरीच काळजी घेतली होती. शिवसेनेनं त्यांच्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं होतं. यावरुन आता भाजपानं शिवसेनेला चिमटा काढला आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं 'रम्याचे डोसे' ही व्यंगचित्र मालिका सुरू केली. यामधून भाजपानं काँग्रेस, राष्ट्रवादीला लक्ष्य केलं होतं. मात्र आता 'रम्याचे डोस'मधून शिवसेनेवर निशाणा साधण्यात आला आहे. यामध्ये एकजण रम्याला 'विश्वास म्हणजे काय रे भाऊ?' असा प्रश्न विचारतो. त्यावर '105 आमदारांना मोकळे सोडणे याला विश्वास म्हणतात,' असं उत्तर रम्यानं दिलं आहे. शिवसेनेला 56 आमदार सांभाळावे लागतात. ते फुटतील याची त्यांना भीती वाटते. मात्र भाजपानं त्यांच्या सर्व आमदारांना मोकळं सोडलं आहे. कारण ते फुटणार नाहीत, याचा पक्षाला विश्वास असल्याचा अप्रत्यक्ष टोला रम्याचे डोसमधून लगावण्यात आला आहे.  शिवसेनेचे आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वीच खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर दगाफटका टाळण्यासाठी शिवसेना नेतृत्त्वानं सर्व आमदारांना रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या सर्व आमदारांचा मुक्काम हॉटेल रिट्रीटमध्ये हलवण्यात आला. शिवसेनेचे अनेक आमदार आत्ताही हॉटेल रिट्रिटमध्येच आहेत. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेना