शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तेव्हा शिवसेनेचे मंत्रीच म्हणत होते, फडणवीसच होणार मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 17:37 IST

भाजपाकडून शिवसेनेच्या माजी मंत्र्याचा व्हिडीओ शेअर

मुंबई: मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा, शिवसेनेत निर्माण झालेला दुरावा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपा अध्यक्ष अमित शहांनी मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन दिल्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा दावा आहे. तर असा कोणताही शिवसेनेला देण्यात आला नव्हता, यावर भाजपा ठाम आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ अमित शहांनीदेखील याबद्दल पुनरुच्चार केला आहे. यानंतर आता भाजपानं शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये राठोड 'पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार' असं म्हणताना दिसत आहेत. भाजपानं त्यांच्या फेसबुक पेजवरुन हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली होती. या यात्रेदरम्यान फडणवीस यांनी अनेक जनसभांना संबोधित केलं. त्या जनसभांमध्ये स्थानिक नेत्यांचीदेखील भाषणं झाली होती. शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांनीदेखील महाजनादेश यात्रेदरम्यान भाषण केलं होतं. त्यात त्यांनी फडणवीस यांचं तोंडभरुन कौतुक करत पुन्हा एकदा तेच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास व्यक्त केला होता. 'मी आज अनेकवेळा मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहतो. एवढं टेन्शन असताना माननीय मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर कधी चिंता मी पाहिली नाही. शांतपणे प्रशासनावर नियंत्रण ठेवून, हसतमुख राहून ते प्रत्येक समस्येवर मार्ग काढतात आणि म्हणून माझ्या मनामध्ये आणि जनतेच्या मनामध्ये अजिबात शंका नाही की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबच होणार', असं राठोड यांनी म्हटलं होतं. राठोड यांचा व्हिडीओ भाजपानं 'एक शिवसैनिक आणि सेनेचे मंत्रीही खात्रीने सांगत होते, देवेंद्र फडणवीस हेच होणार मुख्यमंत्री!' अशा मजकूरासह फेसबुकवर शेअर केला आहे.तत्पूर्वी काल भाजपा अध्यक्ष अमित शहांनी लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चर्चेत शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबद्दल कोणताही शब्द देण्यात आला नव्हता, असं स्पष्ट केलं. शहांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल भाष्य करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या संस्कारांवर अप्रत्यक्षपणे बोट ठेवलं. मुख्यमंत्रिपदाबद्दलचा शब्द दिलाच नाही असं म्हणून देवेंद्र फडणवीस शब्द फिरवत आहेत. मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. खोटं बोलणं मला पटत नाही. बाळासाहेबांचे तसे माझ्यावर संस्कार नाहीत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शहांसोबत बंद झालेल्या बैठकीचा संदर्भ दिला होता.  त्यावर बंद दाराआड झालेली चर्चा जाहीर करणं, उघड करणं हे आमच्या पक्षाच्या संस्कारात बसत नाही, असा टोला शहांनी लगावला.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rathodसंजय राठोडShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAmit Shahअमित शहाUddhav Thackerayउद्धव ठाकरे