शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

Opinion Poll: भाजपाचीच 'दिवाळी'; तब्बल ४८ टक्के मतदारांचा कौल 'कमळा'ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 17:39 IST

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीला मतदारांचा धक्का

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. मतदानाला अवघे दोन दिवस राहिल्यानं सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. याच पार्श्वभूमीवर एका सर्वेक्षणातून राज्यात भाजपाची सत्ता येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तब्बल ४८.८ टक्के मतदारांना भाजपाचीच सत्ता येईल, असं वाटतं. विशेष म्हणजे मतदारांना सत्तेतील भागीदार असलेल्या शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता येण्याची शक्यता अतिशय धूसर वाटते. एबीपी माझानं हे सर्वेक्षण केलं आहे.भाजपाला जवळपास निम्म्या मतदारांनी कौल दिलेला असताना शिवसेनेला केवळ ९ टक्के मतदारांनी पसंती दिली आहे. काँग्रेसची सत्ता येईल, असं मत १०.६ टक्क्यांनी व्यक्त केलं आहे. तर राष्ट्रवादीची सत्ता येऊ शकते, अशी शक्यता ११.३ टक्क्यांनी व्यक्त केली आहे. भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या व्यतिरिक्त इतरांची सत्ता येईल, असा अंदाज ११.३ टक्क्यांनी व्यक्त केला आहे. तर ८.९ टक्के मतदारांनी सांगता येत नाही, असं म्हणत यावर बोलण्यास नकार दिला आहे. भाजपाची सत्ता येईल, असं मत ४८ टक्के मतदारांनी व्यक्त असलं तरी ५४.५ टक्के मतदारांना मुख्यमंत्री बदलला जावं असं वाटतं. तर ४४.७ टक्के मतदारांनी मुख्यमंत्री बदलण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे. राज्यातलं सरकार तातडीनं बदललं जावं, असं वाटणाऱ्या मतदारांचं प्रमाण ५५ टक्के इतकं आहे. तर सरकार बदलण्याची गरज नसल्याचं मत ४४.६ टक्के लोकांनी वर्तवलं आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस