Belgaum Municipal Corporation Election Results: संजय राऊतांचा स्वप्नभंग; ३० जागा जिंकण्याचा होता निर्धार, पण दोनच जागांवर 'महाराष्ट्र एकीकरण'ला आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 01:16 PM2021-09-06T13:16:21+5:302021-09-06T13:21:01+5:30

Belgaum municipal corporation Results: कर्नाटक लोकसभा पोटनिवडणुकीत म.ए. समितीचा शुभम शेळके हा तरुण उभा राहिला होता. त्याला लाखावर मते पडली होती. यावरून संजय राऊतांनी अंदाज बांधला होता. 

Maharashtra Ekikaran Samiti won on 2 seats in Belgaum; Sanjay raut Claimed 30 seats on Election voting Day | Belgaum Municipal Corporation Election Results: संजय राऊतांचा स्वप्नभंग; ३० जागा जिंकण्याचा होता निर्धार, पण दोनच जागांवर 'महाराष्ट्र एकीकरण'ला आधार

Belgaum Municipal Corporation Election Results: संजय राऊतांचा स्वप्नभंग; ३० जागा जिंकण्याचा होता निर्धार, पण दोनच जागांवर 'महाराष्ट्र एकीकरण'ला आधार

googlenewsNext

बेळगाव महानगरपालिकेचा निवडणूक (belgaum municipal corporation) निकाल आज जाहीर होत असून मतमोजणीमध्ये भाजपानेमहाराष्ट्र एकीकरण समितीची धुळधाण उडविली आहे. बेळगाव (शहर) म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समिती (Maharashtra Ekikaran Samiti) असे समीकरण आमदारकीनंतर आता महापालिकेतही यावेळी बदलताना दिसत आहे. मतमोजणी दिवशी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 30 जागा जिंकण्याचा दावा केला होता. आज त्यांचा स्वप्नभंग झाला आहे. (Sanjay raut Claimed 30 seats in Belgaum, but MA Samiti won only 2 seats yet. bjp leading on 36.)

बेळगाव महानगरपालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत, महाराष्ट्र एकीकरण समितीचा दारुण पराभव 

संजय राऊत यांनी या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण आणि इतर आमचे मराठी संघटना मिळून 30 च्या आसपास जागा जिंकू. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, आज दुपारी 12.30 वाजेपर्यंत हाती आलेले निकाल पाहता मए समितीच्या पारड्यात अद्याप दोनच जागा आल्याने भाजपाच्या ताब्यात महापालिका जाण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. 

कर्नाटक लोकसभा पोटनिवडणुकीत म.ए. समितीचे शुभम शेळके हा तरुण उभा राहिला होता. त्याला लाखावर मते पडली होती. एकजूट चांगली होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर सर्व मिळून आम्ही 30 च्या आसपास जागा जिंकू, असा विश्वास राऊत यांना होता. तसेच आम्ही प्रचाराला गेलो तर एकीकरण समितीवर कर्नाटक सरकारचा दहशतवाद होईल म्हणून इथूनच मदत करत असल्याचे म्हटले होते. 

12.30 पर्यंतचा कल काय...
यावेळी महानगरपालिका निवडणूक सर्वप्रथम पक्षीय तिकिटावर झाली. महाराष्ट्र एकीकरण समिती विरुद्ध काँग्रेस विरुद्ध भाजप आणि इतर पक्ष अशा पद्धतीने झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा धक्कादायक रित्या पराभव होत असल्याचे दिसून येत आहे. ज्यांच्या विजयाची शक्यता शंभर टक्के होती असे मराठी आणि समितीचे उमेदवार निवडणुकीत एका मागोमाग एक पराभूत होत असल्यामुळे भाजपची एकहाती विजयाकडे वाटचाल नक्की झाली आहे. 

  • महाराष्ट्र एकीकरण समिती : 2
  • भाजप : 36
  • काँग्रेस : 09
  • अपक्ष : 10
  • एमआयएम : 1 

Web Title: Maharashtra Ekikaran Samiti won on 2 seats in Belgaum; Sanjay raut Claimed 30 seats on Election voting Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.