Maharashtra CoronaVirus update new positive case hospital beds availability | CoronaVirus Update: महाराष्ट्रात कोरोना बेलगाम; 24 तासांत 63,729 नवे रुग्ण, 398 जणांचा मृत्यू 

CoronaVirus Update: महाराष्ट्रात कोरोना बेलगाम; 24 तासांत 63,729 नवे रुग्ण, 398 जणांचा मृत्यू 

मुंबई- देशात सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सरकारी व्यवस्था पार कोलमडल्याचे चित्र दिसत आहे. 24 तासांत समोर येणाऱ्या सक्रिय रुग्णात सातत्याने विक्रमी वाढ होताना दिसत आहे. देशातील नव्या संक्रमितांच्या आकड्याने आता दोन लाखांचा टप्पाही ओलांडला आहे. तर 1 हजार 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात 14 लाख 71 हजार 877 एवढे सक्रिय कोरोनाबाधित आहेत. (Maharashtra CoronaVirus update new positive case hospital beds availability)

महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात कोरोनाने कहर केला आहे. महाराष्ट्रात करोनाला ब्रेक लावण्याचे सर्व प्रयत्न फेल होताना दिसत आहेत. येथे कोरोना बेलगाम होताना दिसत आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 63,729 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 398 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे तब्बल 59,551 जणांचा मृत्यू झाला आहे.

CoronaVirus: चिंताजनक! हवेच्या माध्यमाने वेगाने पसरतो कोरोना; ठोस पुराव्यांसह Lancet चा दावा...!

महाराष्ट्रात एकूण रुग्ण : 37,03,584 
एकूण रिकव्हरी : 30,04,391
एकूण मृत्यू : 59,551
एकूण सक्रिय रुग्ण : 6,38,034

मुंबईत बेडच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर बीएमसीने बेड वाढविण्याचे काम सुरू केले आहे. गंभीर रुग्णांसाठी रुग्णालये उपलब्ध व्हावीत यादृष्टीने, आता सोम्य लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी लक्झरी हॉटेलचा वापरही करण्यात येत आहे. 

CoronaVirus : भयावह...! धक्कादायक...! भोपाळमध्ये एकाच वेळी 112 जणांवर अंत्यसंस्कार, पण सरकारी रेकॉर्डवर फक्त चार जण

जसलोक रुग्णालयाचे रुपांतर कोविड रुग्णालयात -
बेडची कमतरता दूर करण्यासाठी आता बीएमसीने जसलोक रुग्णालयाचे रुपांतर कोविड रुग्णालयात केले आहे. येथे आता केवळ कोरोना रुग्णांवरच उचार केले जातील. जसलोकमधील नॉन कोविड रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांत हलवीले जात आहे. एढेच नाही, तर येथे आणखी 250 बेड वाढविण्यात येत आहेत.

CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

ऑक्सीजनची कमतरता -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून, 30 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 11.9 लाखांवर जाईल आणि ऑक्सीजनची मागणी 200 मेट्रिक टनवर पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या महाराष्ट्रात 1200 मेट्रिक टन ऑक्सीजनचे उत्पादन होते. मात्र, मागणी 1300 ते 1500 मेट्रिक टन ऑक्सीजनची आहे.


 

English summary :
Maharashtra CoronaVirus update new positive case hospital beds availability

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra CoronaVirus update new positive case hospital beds availability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.