CoronaVirus News: दोन दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत १२ हजारांची घट; राज्यासाठी 'पॉझिटिव्ह' बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 21:11 IST2021-03-30T21:10:54+5:302021-03-30T21:11:30+5:30

CoronaVirus News: सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत घट; नव्या रुग्णांची संख्या आणि बऱ्या झालेल्यांची संख्या यांच्यातलं अंतर झालं कमी

Maharashtra Corona Updates state reports 27918 new COVID19 cases 23820 recoveries and 139 deaths in the last 24 hours | CoronaVirus News: दोन दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत १२ हजारांची घट; राज्यासाठी 'पॉझिटिव्ह' बातमी

CoronaVirus News: दोन दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत १२ हजारांची घट; राज्यासाठी 'पॉझिटिव्ह' बातमी

Maharashtra Corona Updates: गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ सुरू होती. मात्र काल आणि आज कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २७ हजार ९१८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर २३ हजार ८२० जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. रविवारी राज्यात ४० हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले होते. मात्र दोनच दिवसांत हा आकडा १२ हजारांनी खाली आला आहे.




राज्यात काल दिवसभरात कोरोनाचे ३१ हजार ६४३ नवे रुग्ण वाढले होते. तत्पूर्वी रविवारी ४० हजाराहून अधिक रुग्ण आढळले होते. तर शनिवारी राज्यात ३५ हजार ७२६ नवे रुग्ण वाढले होते. मात्र गेले दोन दिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधितांचा २७ लाख ७३ हजार ४३६ वर पोहोचला आहे. आतापर्यंत २३ लाख ७७ हजार १२७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ५४ हजार ४२२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला राज्यात ३ लाख ४० हजार ५४२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: Maharashtra Corona Updates state reports 27918 new COVID19 cases 23820 recoveries and 139 deaths in the last 24 hours