शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra CM: ...अन्यथा देवेंद्र फडणवीस येडियुरप्पांसारखा विश्वासमताआधीच राजीनामा देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 11:52 IST

उद्या ५ वाजता बहुमत चाचणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई: सर्वोच्च न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यातच विश्वासदर्शक ठरावावर खुलं मतदान घेऊन त्याचं थेट प्रक्षेपण करण्याच्या स्पष्ट सूचना न्यायालयानं दिल्या आहेत. उद्या संध्याकाळी ५ वाजता बहुमत चाचणी होईल. त्यामुळे बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी आता केवळ ३० तास उरले आहेत. त्यामुळे 'देवेंद्र सरकार-2' संकटात सापडलं आहे. ही परिस्थिती पाहता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचा नेता निवडून आला, तरच विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायचं. अन्यथा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा, अशी भूमिका भाजपाकडून घेण्यात आली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात अशाच प्रकारे बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. नव्या सरकारला तातडीनं विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देण्यात यावा,  अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. यावर निकाल देताना न्यायालयानं उद्याच विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे भाजपाला आमदारांची फोडाफोड करण्यासाठी फार वेळ मिळणार नाही.एका बाजूला बहुमताचा आकडा गाठण्याचं आव्हान असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीनं भाजपाला धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते म्हणून विधिमंडळ सचिवालयात जयंत पाटील यांचीच अधिकृत गटनेते म्हणून नोंद असल्याची माहिती पुढे आली आहे. तशी नोंददेखील विधिमंडळ सचिवालयात आहे. मात्र याबद्दलचा अंतिम अधिकार विधानसभा अध्यक्ष घेतात. त्यामुळे अध्यक्ष नेमका काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपाचा अध्यक्ष असल्यास सकारात्मक घडामोडी घडू शकतात.भाजपा विश्वासदर्शक ठराव जिंकेल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. तत्पूर्वी काल रात्री ग्रँड हयात हॉटेलमध्ये महाविकासआघाडीच्या १६२ आमदारांनी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेत शक्तिप्रदर्शन केलं आहे. या आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेलं पत्रदेखील महाविकासआघाडीकडून राज्यपालांना देण्यात आलं आहे. महाविकासआघाडीनं १६२ आमदार असल्याचा दावा केल्यानं भाजपा बहुमत कसं सिद्ध करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना