शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Chiplun Flood : सीएम वगैरे गेले उडत; नारायण राणेंनी व्यक्त केला जिल्हाधिकाऱ्यांवर संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 08:02 IST

Maharashtra Chiplun Flood : व्यापाऱ्यांनी वाचला नारायण राणेंसमोर तक्रारींचा पाढा. दौऱ्यादरम्यान अधिकारी उपस्थित नसल्यानं नारायण राणेंनी व्यक्त केला संताप. 

ठळक मुद्देव्यापाऱ्यांनी वाचला नारायण राणेंसमोर तक्रारींचा पाढा.दौऱ्यादरम्यान अधिकारी उपस्थित नसल्यानं नारायण राणेंनी व्यक्त केला संताप. 

राज्यातील पूर परिस्थितीमुळे अनेक भागांत मोठं नुकसान झालं आहे. चिपळूण दौऱ्यादरम्यान अधिकारी उपस्थित नसल्यानं भाजप नेत्यांनी मोठा संताप व्यक्त केला. व्यापाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोर तक्रारींचा पाढ वाचला. त्यानंतर नारायण राणे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून फैलावर घेतलं. परंतु यावेळी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करताना त्यांचा तोल गेल्याचं दिसलं. सीएम बीएम गेला उडत, असं वक्तव्य राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर संवाद साधताना केलं. 

"सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगोत पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथे कोण आहे? इथे तुमचा एक तरी अधिकारी उपस्थित आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं. आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा," असं म्हणत नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. "मला कोणीही सीईओ भेटले नाहीत. मी इथेच बाजारपेठेत उभा आहे. कोण सीईओ आहेत आणि कुठे आहेत हे मला दाखवा," असंही राणे म्हणाले. 

भाजप नेत्यांकडून पाहणीकेंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी चिपळूण येथे जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यानंतर राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "मुख्यमंत्री आले त्यांनी पाहणीही केली. ते त्यांच्या पद्धतीने आढावा घेतीलच. मात्र, आपणही पंतप्रधानांना रिपोर्ट देणार आहोत. येथील नागरिकांना कशा प्रकारे दिलासा देता येईल आणि पुन्हा आपल्या पायावर उभे करता येईल यावर विचार करू. हे सर्व लोक आमचे आहेत यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही, याची काळजी घेऊ," असं राणे पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले होते. 

मुख्यमंत्र्यांवर टीका"राज्यावर सातत्याने येणाऱ्या संकटांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पायगूणच कारणीभूत आहे,. ते मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात वादळं काय, पाऊस काय, कारोना काय, सर्व सुरूच आहे. एवढेच नाही, तर कोरोना ही त्यांची देन आहे आपल्याला. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊन आले. पाय पाहायला पाहिजे, पांढरे पाय आहेत का?," अशा शब्दात नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpravin darekarप्रवीण दरेकर