शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
3
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
4
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
5
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
6
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
7
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
8
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
9
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
10
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
11
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
12
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
13
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
14
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
15
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
16
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
17
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
18
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
19
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
20
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

महाराष्ट्र बजेट २०२० : मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत बांधकामक्षेत्रासाठी उभारी देणारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 1:25 PM

गेल्या काही वर्षांपासून बांधकामक्षेत्रात प्रचंड मंदी

ठळक मुद्देपुण्यात वर्षभरात ३ लाख २३ हजार ९८० दस्तनोंदणी व ५ हजार कोटींचा महसूलपुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई आणि नागपूर या महानगरांमध्ये पुढील दोन वर्षांसाठी एक टक्का सवलत

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यात वर्षभरामध्ये तब्बल ३ लाख २३ हजार ९८० दस्तनोंदणी झाली असून, यामधून शासनाला सुमारे ५ हजार ३२ कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क (महसूल) मिळाले आहे. गेल्या काही वर्षांपासून बांधकामक्षेत्रात प्रचंड मंदी असून, राज्य शासनाने पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई आणि नागपूर या महानगरांमध्ये पुढील दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत जाहीर केली आहे. यामुळे मंदीच्या कचाट्यात सापडलेल्या बांधकामक्षेत्रातील उभारी देण्यासाठी शासनाच्या निर्णयाची मदत होणार असल्याची प्रतिक्रिया बांधकाम व रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केल्या जात आहेत. गेल्या चार-पाच वर्षांपासून देशात सुरू असलेल्या मंदीचा सर्वांत मोठा फटका बांधकामक्षेत्राला बसला आहे. यामध्ये प्रामुख्याने पुणे, मुंबई, ठाणे, नागपूरसारख्या शहरामध्ये याची मोठी झळ बसली आहे. यामुळे शासनाने गेल्या दोन वर्षांमध्ये रेडिरेकनरच्या दरामध्येदेखील वाढ केली नाही. याशिवाय इतरदेखील अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. यामध्ये आता शासनाकडून देण्यात आलेल्या एक टक्का सवलतीमुळेदेखील मोठा दिलासा मिळणार आहे.----------------पुणे शहरामध्ये गेल्या वर्षभरात झालेली दस्तनोंदणी व मुद्रांक शुल्कवसुलीपुणे शहर : २ लाख २ हजार ३७५ दस्तनोंदणी, ४ हजार १८३ कोटी मुद्रांक शुल्कवसुलीपुणे ग्रामीण : १ लाख २१ हजार ५३५ दस्तनोंदणी, ८४९ कोटी ६५ लाख मुद्रांक शुल्कवसुली.--------------------राज्य सरकारने पुढील दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कात १ टक्का सवलत जाहीर केली आहे, ही बाब बांधकामक्षेत्रासाठी महत्त्वाची असून आम्ही त्याचे स्वागत करतो. पुणे शहरातील प्रस्तावित रिंगरोडच्या कामाला गती देण्याबरोबरच मेट्रो प्रकल्पाच्या विस्तारात राज्य सरकार अधिक लक्ष घालत आहे, ही बाबदेखील शहराच्या व बांधकाम विकसकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.  -सुहास मर्चंट, अध्यक्ष, क्रेडाई पुणे मेट्रो-----------------नवीन राज्य सरकारने सादर केलेला हा पहिलाच अर्थसंकल्प अनेक बाबींनी सकारात्मक आणि चांगला आहे. मुद्रांक शुल्कामध्ये जाहीर झालेली १ टक्का सवलत ही ग्राहकांच्या मागणीमध्ये नक्कीच वाढ करेल. वाढलेला आमदार निधी, पुणे मेट्रो प्रकल्पाचा विस्तार, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आदींसाठी जाहीर झालेल्या बाबी या शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलची वाढलेली किंमत वगळता हा अर्थसंकल्प समाधानकारक आहे. -रणजित नाईकनवरे, उपाध्यक्ष, क्रेडाई पुणे मेट्रो  -------------------मुद्रांक शुल्कावर एक टक्का दोन वर्षे सूट देऊन महाराष्ट्र सरकारने बांधकामक्षेत्रातील मरगळ दूर करण्याच्यादृष्टीने एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे असोसिएशन व सर्वसामान्यांच्यावतीने स्वागत पण अजूनही जे एल.बी.टी, मेट्रोसारखे अधिभार आहे ते कमी केले पाहिजे आणि नाशिक पुणे रेल्वेसाठी जो अधिभार प्रस्तावित प्रस्ताव रद्द केला पाहिजे, म्हणजे असंघटित ग्राहकांना दिलासा मिळेल आणि रिअल इस्टेट क्षेत्राला उभारी येण्यासाठी मदत होईल. -सचिन शिंगवी, अध्यक्ष असोसिएशन आॅफ रिअल इस्टेट एजंट्स, पुणे                ०००

टॅग्स :Puneपुणेbudget 2020बजेटbusinessव्यवसायState Governmentराज्य सरकार