Uddhav Thackeray: विधानसभेत उद्धव ठाकरे संतापले; “पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 04:33 PM2022-03-25T16:33:24+5:302022-03-25T17:32:17+5:30

Maharashtra Budget Session: सत्ता मिळवण्यासाठी कुटुंबावर तणाव आणू नका. मी तुमच्यासोबत येतो. टाका मला तुरुंगात असा इशाराच उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

Maharashtra Budget Session: Uddhav Thackeray angry against BJP in Assembly; Said Put me in jail | Uddhav Thackeray: विधानसभेत उद्धव ठाकरे संतापले; “पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर..."

Uddhav Thackeray: विधानसभेत उद्धव ठाकरे संतापले; “पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर..."

Next

मुंबई – गेल्या काही दिवसांत राज्यात सुरू असलेल्या ईडी कारवाईविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. ठाकरे कुटुंबावर होत असलेल्या आरोपांवर सभागृहात त्यांनी सडेतोड उत्तर दिले. प्रतिमा मलिन करणे आणि बदनामी करणे हे कुठल्या थराला जाऊन करणार आहात. हा धुतराष्ट्र नाही छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. या वाटेला जावू नका. त्यातून कुणाचंही भले होणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी सभागृहात दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले की, मी घाबरलोय म्हणून असं बोलत नाही. जे काही मतभेद असतील तर सांगा, पण बदनामी करू नका. सत्ता मिळवण्यासाठी कुटुंबावर तणाव आणू नका. मी तुमच्यासोबत येतो. टाका मला तुरुंगात...कुटुंबाची बदनामी आम्ही कधीच केली नाही. तुमच्या सवडीनं आरोप गोळा करा. पेनड्राइव्ह आणण्यापेक्षा मला तुरुंगात टाका, मी तयार आहे. तुरुंग कोणता तर कृष्ण जन्मभूमीचा तुरुंग असेल त्यात टाका. मी कृष्ण नाही तसं तुम्ही कंस नाही. बाळासाहेबांनी तुमच्या नेत्यांना वाचवलं मग त्यांच्याकडे जाऊन काय उत्तर देणार? २०१४ मध्ये युती तुम्ही तोडली. मी तेव्हाही हिंदु होता. तुरूंगात टाकणार असाल मला टाका, सगळ्यांची जबाबदारी मी घेतो. १९९३ मध्ये ज्या शिवसैनिकांनी मुंबई वाचवली, हिंदूंना वाचवलं. तेव्हा अनिल परब यांना रस्त्यावर मारहाण झाली होती. त्यांचा बंगला तोडणार का? राज्यात अघोषित आणीबाणी लादली असल्याचं त्यांनी सांगितले.

तसेच हर्षवर्धन पाटील यांना झोप लागत नव्हती मग त्यांनी झोप लागायचं औषध घेतले. भाजपाकडे असं कोणतं झोपेचे औषध आहे. आम्ही दाऊदची माणसं, भ्रष्टाचारी असं म्हणता. पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसला असता ना? केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून अंगावर काय येता? हा नामर्दपणा आहे. हिंमत असेल समोर या, घरच्यांवर कसले आरोप करता? महाभारतातील शिखंडी होता त्यासारखं कशाला काम करता? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला(BJP) विचारला आहे.

Web Title: Maharashtra Budget Session: Uddhav Thackeray angry against BJP in Assembly; Said Put me in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.