शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Maharashtra Budget Session: निधी नाही तर अर्थसंकल्पावर बहिष्कार; शिवसेनेचे २५ आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटले

By यदू जोशी | Updated: March 7, 2022 11:43 IST

महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासून शिवसेनेच्या आमदारांमध्ये निधीवाटपाबाबत कमालीची खदखद आहे.

यदु जोशीमुंबई - शिवसेनेच्या २५ आमदारांनी निधीबाबत त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आता दंड थोपटले आहेत. हे आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांना दोन दिवसांपूर्वी भेटले आणि त्यांनी सांगितले की निधीवाटपाबाबत आमच्यावर कमालीचा अन्याय होत आहे. निधी मिळाला नाही तर आम्ही अर्थसंकल्पाच्या वेळी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकू. या आमदारांच्या आक्रमक पावित्र्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. २०२२-२३ चा अर्थसंकल्प ११ मार्च रोजी विधिमंडळात सादर होणार आहे. 

प्रकाश आबिटकर, आशिष जयस्वाल, भरत गोगावले, वैभव नाईक यांच्या नेतृत्वात हे आमदार मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जे प्रस्ताव अर्थसंकल्पीय तरतुदीसाठी देण्यात आले आहेत त्यात काँग्रेसच्या आमदारांच्या मतदारसंघांसाठी ९०० कोटी रुपये, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघांसाठी ७०० कोटी रुपये तर शिवसेना आमदारांच्या मतदारसंघांसाठी केवळ ३०० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. आधीही अन्याय सुरू होताच आता पुन्हा तोच प्रकार होणार असेल तर आम्ही अर्थसंकल्प सादर होताना विधानसभेत बसणार नाही. सभागृहाच्या लॉबीत किंवा बाहेर विधानभवनच्या पायऱ्यांवर बसू असे या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासून शिवसेनेच्या आमदारांमध्ये निधीवाटपाबाबत कमालीची खदखद आहे. वित्त विभाग, ग्रामविकास विभाग, जलसंपदा या राष्ट्रवादीकडील खात्यांकडून निधीवाटपाबाबत दुजाभाव केला जात असल्याचे सुरुवातीपासूनच त्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीचे मंत्री त्यांच्या आमदारांना बोलावून बोलावून निधी देतात आणि आम्ही गेलो म्हणजे राज्याच्या आर्थिक परिस्थितीचे कारण देवून हात आखडता घेतात अशी तक्रार शिवसेनेचे आमदार सातत्याने करीत आले आहेत. मुख्यमंत्रिपद आपल्याकडे आहे पण जास्त निधी मात्र राष्ट्रवादीवाले पळवितात असे त्यांचे म्हणणे आहे. त्यातआता काँग्रेसकडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाची भर पडली आहे. 

सूत्रांनी सांगितले की २५ आमदारांची गंभीर तक्रार मुख्यमंत्री ठाकरे यांनी ऐकून घेतली आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावून घेत त्यांना या तक्रारीचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी दिली. शिंदे व देसाई यांनी आता या आमदारांच्या मतदारसंघातील कामे आणि त्यासाठी येणारा खर्च याचा तपशील मागितला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी त्यांनी चर्चा केली.

टॅग्स :Budget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस