तुमच्या घरगड्यांना त्रास होतोय म्हणून ईडी घरगडी वाटतेय का?; फडणवीसांचा थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 06:54 IST2022-03-26T06:49:52+5:302022-03-26T06:54:31+5:30
मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे न दिल्याने विरोधकांचा सभात्याग

तुमच्या घरगड्यांना त्रास होतोय म्हणून ईडी घरगडी वाटतेय का?; फडणवीसांचा थेट सवाल
मुंबई : ‘तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही आणि तुम्ही म्हणजे मुंबई नाही. हा भ्रम मनातून काढून टाका. ईडी तुमच्या घरगड्यांना चौकशीला बोलावते म्हणून तुम्हाला ती घरगडी वाटते का?,’ असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केला.
पांडवांचे राज्य कौरवांनी कपटाने हिसकावून घेतले होते. मात्र, अर्जुन घाबरला नाही. पोलिसांना घरगडी बनवून तुम्ही आमच्या विरोधात कितीही कारवाया केल्या तरी आम्ही घाबरणार नाही, मुख्यमंत्र्यांनी एकाही मुद्द्याला उत्तर दिले नाही, असे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला.