Maharashtra Budget : अंगणवाडी सेविकांसाठी अर्थसंकल्पातून मोठी घोषणा, मोबाईल मिळणार, बालसंगोपनासाठीच्या निधीत अडीज हजार रुपयांची घसघशीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 15:26 IST2022-03-11T15:25:45+5:302022-03-11T15:26:20+5:30
Maharashtra Budget: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केला असून, या अर्थसंकल्पामधून अंगणवाडी सेविकांसांठी मोठ्या घोषणा करण्याता आल्या आहेत.

Maharashtra Budget : अंगणवाडी सेविकांसाठी अर्थसंकल्पातून मोठी घोषणा, मोबाईल मिळणार, बालसंगोपनासाठीच्या निधीत अडीज हजार रुपयांची घसघशीत वाढ
मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केला असून, या अर्थसंकल्पामधून अंगणवाडी सेविकांसांठी मोठ्या घोषणा करण्याता आल्या आहेत. यामध्ये राज्यातील एक लाख ३० हजार अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षक भगिनींना मोबाईल देण्याची घोषणा करण्यात आली आहेत. त्याबरोबरच अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २५०० रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पामधून २०२२-२३ वर्षासाठी महिला आणि बालकल्याण विभागासाठी २ हजार ४७२ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याबरोबरच इतर महत्त्वाच्या घोषणाही करण्यात आल्या आहेत.
अर्थसंकल्पातील काही महत्त्वाच्या घोषणा
- एकात्मिक बाल विकास योजनेची अंमलबजावणी योग्यरित्या करण्यासाठी e - शक्ती योजनेतून एक लाख लाख ३० हजार अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षक भगिनींना मोबाईल सेवा उपलब्ध करुन देण्यात येईल.
-0 ते 18 वयोगटातील बालकांचे पालन करणाऱ्या संस्था किंवा कुटुंबाला दर महिन्याला देण्यात येणाऱ्या प्रति बालक अनुदानात 1125 रु वरून 2500 रुपयांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे
- जिल्हा वार्षिक योजनेतील एकूण निधीपैकी तीन टक्के निधी महिला व बाल विकास योजनेसाठी राखून ठेवण्याचा निर्णय
- त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अमृत महोत्सवी महिला व बाल भवन उभारण्यात येणार
- नागरी भागातील अति तीव्र कुपोषित बालकांसाठी ग्राम बाल विकास केंद्राच्या धर्तीवर नागरी बालविकास केंद्र सुरू करण्याचा निर्णय
- सन 2022-23 वर्षासाठी महिला व बालकल्याण विभागासाठी 2 हजार 472 कोटी रुपयांचा निधी