लाडकी बहीण योजना बंद होणार की...? अर्थसंकल्पातून फडणवीसांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 15:50 IST2026-03-06T15:16:28+5:302026-03-06T15:50:08+5:30

Maharashtra Budget 2026: गेल्या काही दिवसांपासून लाकडी बहीण योजनेबाबत पसरत असलेल्या शंका कुशंकांच्या पार्श्वभूमीवर आज सादर होत असलेल्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री या योजनेबाबत काय घोषणा करतात याकडे राज्यातील महिला वर्गाचे सर्वाधिक लक्ष लागलेले होते.

Maharashtra Budget 2026: Will the Ladki Bahin Yojana continue or be discontinued? Fadnavis' big announcement from the budget | लाडकी बहीण योजना बंद होणार की...? अर्थसंकल्पातून फडणवीसांची मोठी घोषणा

लाडकी बहीण योजना बंद होणार की...? अर्थसंकल्पातून फडणवीसांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा २०२६-२७ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज विधानसभेत मांडला. गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेबाबत पसरत असलेल्या शंका कुशंकांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री या योजनेबाबत काय घोषणा करतात याकडे राज्यातील महिला वर्गाचे सर्वाधिक लक्ष लागलेले होते. दरम्यान, या अर्थसंकल्पामधून मुख्यमंत्र्यांनी या योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला वर्गाला मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या भवितव्याबाबत माहिती देताना ‘’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहणार आहे. तसेच या योजनेकरिता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आली आहे’’, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. मात्र या योजनेमधून महिलांना मिळणाऱ्या लाभामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ करण्याची घोषणा मात्र मुख्यमंत्र्यांनी केलेली नाही.

राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुती सरकारने आपल्या आधीच्या कार्यकाळात जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कमालीची लोकप्रिय ठरलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांने दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. दरम्यान, या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे या योजनेचे हप्ते अनेकदा लांबणीवर पडल्याचे प्रकारही घडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही योजना सुरू राहणार की बंद होणार याबाबत वारंवार अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या अर्थसंकल्पामधून केलेल्या घोषणेमुळे ही योजना यापुढेही सुरू राहणार असल्याचे निश्चित झाले आहे.    

Web Title : लाडली बहिन योजना जारी रहेगी: फडणवीस ने बजट में घोषणा की।

Web Summary : मुख्यमंत्री लाडली बहिन योजना जारी रहेगी, फडणवीस ने बजट में घोषणा की। महिला लाभार्थियों को राहत देते हुए धन आवंटित किया गया। लाभों में कोई वृद्धि नहीं हुई। वित्तीय तनाव और विलंबित किश्तों के बावजूद, लोकप्रिय योजना जारी रहेगी।

Web Title : Ladki Bahin Yojana to continue: Fadnavis announces in budget.

Web Summary : The 'Mukhyamantri Ladki Bahin Yojana' will continue, Fadnavis announced in the budget. Funds allocated, providing relief to women beneficiaries. No increase in benefits was announced. Despite financial strain and delayed installments, the popular scheme will continue.