Maharashtra Budget 2025 ( Marathi News ) : राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ९ हजार ७१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाला ५२६ कोटींची तरतूद. जलसंधारण विभागाला ४ हजार २४७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सध्याचा काळ हा एआयचा आहे, आता राज्यातील शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात एआयचा वापर करता यावा यासाठी अजित पवार यांनी एआय संदर्भात मोठी घोषणा केली आहे. कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण आखण्यात येणार आहे. याशिवाय शेतमालाला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल. जलयुक्त शिवार २.० च्या टप्प्यातील कामं मार्गी लागणार असल्याचं अर्थमंत्री अजित पवार म्हणाले.
मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ६४ हजार कोटींचे प्रकल्प
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात २०२५-२६ या वर्षासाठी अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार यांनी सुरुवातीलाच मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ६४ कोटींचा प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात दिली.
सध्या मुंबईतील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तासन तास वाहन रस्त्यावरतीच असतात. अनेकांना मिनिटांचा प्रवास काही तासांवर जातो. दरम्यान, आता मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ६४ हजार कोटींचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. ययाशिवाय पुणे शिरूर उन्नत मार्गाचं काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. तर तळेगाव ते चाकण उन्नत मार्गाचं काम प्रस्तावित असल्याचं त्यांनी सांगितलं.