शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

महाराष्ट्र बजेट 2019: सिंचन प्रकल्पांसाठी १२ हजार कोटींची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 3:14 AM

राज्यातील २६ अपूर्र्ण सिंचन प्रकल्पांचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यात आला असून सदर प्रकल्पांसाठी २२,३९८ कोटी रुपये लागणार आहेत.

मुंबई : राज्यातील २६ अपूर्र्ण सिंचन प्रकल्पांचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यात आला असून सदर प्रकल्पांसाठी २२,३९८ कोटी रुपये लागणार आहेत. त्यापैकी ३,१३८ कोटी केंद्रीय अर्थसंकल्पातून मिळणार आहेत. तसेच सिंचन प्रकल्पांसाठी १२,५९७ कोटी एवढी तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.अर्थसंकल्पातील तरतुदीगोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प डिसेंबर २०२१ पर्यत पूर्ण करण्याचे नियोजन.प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेसाठी 2,720 कोटीबळीराजा जलसंजिवनी योजनेकरीता 1,531 कोटीजलयुक्त शिवार अभियानातंर्गत ६ लाख २ हजार मृद व जलसंधारणाची कामे पूर्ण. त्यातून २६.९० टीएमसी पाणीसाठा क्षमता निर्माण, या योजनेवर 8,946 कोटी खर्च.मृद व जलसंधारण विभागाकरीता रु. 3,182.28 कोटीमागेल त्याला शेततळे या योजनेतंर्गत २५ हजार शेततळी पूर्ण करण्यासाठी 125 कोटीसुक्ष्म सिंचनासाठी 350 कोटींची तरतूद.रस्ते विकास व बांधकाम विभागरस्ते विकास योजनेतंर्गत सन २००१-२०२१ मध्ये एकूण ३,३६,९९४ किमी लांबीच्या रस्त्यांचे उद्दिष्ट, आतापर्यत २,९९,४४६ किमी पेक्षा जास्त लांबीचे रस्ते विकसित.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत ८,८१९ किमी लांबीची कामे पूर्ण, उर्वरित २० हजार २५७ किमी लांबीची कामे प्रगतीपथावर.नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गाचे काम जलदगतीने सुरु, बांधकामाचे १६ पॅकेजेस् मध्ये नियोजन, पैकी १४ पॅकेजेसचे कायार्रंभ आदेश दिले गेले.मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे अंतर कमी करण्याच्या प्रकल्पावर रु. 6,695 कोटी इतका खर्च अपेक्षित.सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पुल ३ च्या बांधकामासाठी 775.58 कोटीच्या कामास प्रशासकीय मान्यता.11,332.82 कोटीच्या वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाचे काम प्रगतीपथावर, काम ५ वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन.१२ बलुतेदारांसाठी शंभर कोटीग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक असलेल्या १२ बलुतेदारांच्या सक्षमीकरणासाठी खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत कुटीरोद्योग, लघुद्योग यांना प्रोत्साहन देणार, यासाठी 100 कोटी निधी राखीव.ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या मानधनामध्ये लक्षणीय वाढ करण्यासाठी २०० कोटी इतका निधी राखीव.तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकांचे आधुनिकीकरण. यासाठी १०० कोटीम. रा. मार्ग परिवहन महामंडळास ७०० नवीन बसेस खरेदी करण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय, चालू आर्थिक वर्षात १६० कोटीमुंबईतील एशियाटीक ग्रंथालयाच्या डिजिटायजेनसाठी ५ कोटीकला आणि क्रीडा क्षेत्रमुंबई विद्यापीठात कै. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टूडंटन्ड युथ मुव्हमेंट नावाचे केंद्र स्थापन करणार.दृष्य कलेच्या क्षेत्रात महत्वाचे योगदान देणाऱ्या नामवंत व ज्येष्ठ कलाकारांचा यथोचित सन्मान करण्यासाठी कै. वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार देण्याचा निर्णय.सर जे.जे. कला, वास्तुशास्त्र आणि उपयोजित कला या महाविद्यालयांच्या आवश्यक सुविधांसाठी १५० कोटी निधी देण्याचा निर्णय, चालू आर्थिक वर्षात २५ कोटींची तरतूद.औरंगाबाद जिल्हयातील करोडी येथे राज्यस्तरीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार तसेच वाळुंज, जि. औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिडांगण तयार करणार.आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणवैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागासाठी 3,980.87कोटीसार्वजनिक आरोग्य विभागाकरिता 10,581.79कोटीसंजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेअंतर्गत मिळणाºया अनुदानात ६०० रुपयावरून १००० रुपये वाढवर्धा, गडचिरोली व चंद्रपूर या दारूबंदी असलेल्या जिल्हयांमध्ये व्यसनमुक्तीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी चालू आर्थिक वर्षात ५० कोटी रू. राखीव.शिक्षण व सामाजिक न्यायइतर मागासवर्ग (ओ.बी.सी.) लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळास 200 कोटी.इतर मागास प्रवर्गातील मुलांसाठी १८ आणि मुलींसाठी १८ अशी एकूण ३६ वसतीगृहे सुरू करणार५ वी ते १० वीत शिकणाºया इतर मागास प्रवर्गातील मुलींसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजनाराज्यातील गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया या जिल्हयांच्या नक्षलग्रस्त भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकासाचा विशेष कार्यक्रम राबविणार, तीन वर्षात 500 कोटी रू. निधी उपलब्ध करणार, यावर्षी १५० कोटी राखीव.इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत राज्यातून व विभागातून सर्वप्रथम येणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिंनींना स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्काराने गौरविणार.१ लक्ष व ५१ हजार रुपयांचे रोख पुरस्कारलोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी 100 कोटी रू. राखीव.विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी स्वयंरोजगार योजना तयार करण्याचा निर्णय, यासाठी पहिल्या वर्षी २०० कोटी.कोतवालांच्या मानधनात ५० टक्केपेक्षा अधिकची वाढ, गट ड च्या पद भरतीमध्ये ४० टक्के पदे कोतवालांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय.नागपूर व अमरावती विभागातील लिलावाद्वारे अथवा अन्य प्रकारे भाडे तत्वावर दिलेल्या जमिनींचे मालकी हक्क देण्यासाठी फ्रि-होल्ड करण्याचा निर्णय.पर्यटन विकासशिर्डी येथे येणाºया भाविकांच्या सुरक्षेसाठी गृह, नगरविकास, परिवहन विभाग तसेच शिर्डी संस्थान यांच्या समन्वयातून पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय तसेच सिंधुदूर्ग, औरंगाबाद व नागपूर या तीन जिल्हयात आणि शिर्डी, मुंबई येथे पर्यटन पोलीस ही संकल्पना राबविण्याचा निर्णय. तरतूद नाही.सिंधुदूर्ग जिल्हयातील सावंतवाडी येथे सुरक्षा रक्षक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय.रायगड किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्याकरिता रू. 606 कोटीमहाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान आंबेगाव (बु.), ता. हवेली, जि. पुणे येथे युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील शिवसृष्टी प्रकल्पाच्या निर्मितीसाठी यावर्षी ५० कोटी निधी देणार.दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेसाठी मुदत ठेवीमध्ये आणखी १० कोटींची तरतूद, या योजनेसाठी २५ कोटीमहात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ अंदाजे ८ हजार पत्रकारांना होणार असून विमा हप्त्यासाठी आवश्यक निधी.