शहरं
Join us  
Trending Stories
1
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
2
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
3
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
4
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला
5
अबब! ही तर फक्त सुरुवात...पारा आणखी 3 ते 4 अंशांनी वाढणार, IMDचा इशारा
6
बापरे एवढी बेरोजगारी! IIT च्या ७००० विद्यार्थ्यांना नोकरी मिळेना; मुंबई, दिल्लीचे माजी विद्यार्थांना साकडे
7
फ्लाइटला ८ तास उशीर, क्रू नसल्याने विमानच उडालं नाही! अक्षया नाईक संतापली, म्हणाली- "लहान मुलं, वयोवृद्ध माणसं..."
8
'या' ३१ जागांवर 'अबकी बार ४०० पार'चं भवितव्य; UP मध्ये भाजपाचा खेळ बिघडणार?
9
Video: पती घरी येताच पत्नीने लाथाबुक्क्यांनी सुरु केली मारहाण, सीसीटीव्ही फुटेज होतेय व्हायरल
10
“स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर गायब, खरे गांधीवादी असते तर...”; रोहित पवारांची अण्णा हजारेंवर टीका
11
"संविधान धर्माच्या नावावर आरक्षण देत नाही, मुस्लिम आरक्षण संपवणार", अमित शाह स्पष्टच बोलले
12
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
13
Rajnath Singh : चांदीचा मुकुट घालताच राजनाथ सिंह म्हणाले, "हा विकून गरिबाच्या मुलीसाठी पैंजण बनवा"
14
हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ? पत्नी नताशासोबत दुरावा, अभिनेत्रीने केलं असं काही.... 
15
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
16
"RCB तून बाहेर पड आणि दिल्लीकडून खेळ मग...", दिग्गजाचा Virat Kohli ला सल्ला!
17
बांग्लादेशी खासदाराची कोलकात्यात निर्घृण हत्या; जवळच्या मित्रानेच दिली 5 कोटींची सुपारी
18
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
19
CSK ला हरवलं म्हणजे IPL ट्रॉफी जिंकली, असं होत नाही; माजी खेळाडूचा RCB ला टोमणा
20
'श्रीवल्ली' येतेय सर्वांना तिच्या तालावर नाचवायला, 'पुष्पा 2' मधील रश्मिकाच्या गाण्याची झलक बघाच

Maharashtra Budget 2018: UPSCत मराठी टक्का वाढवण्यासाठी सरकारचे पाऊल, ५० कोटींची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2018 3:01 PM

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांसाठी सरकारने या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे....

मुंबई - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आपला चौथा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांच्या पोतडीतून शेतीसह नवीन रोजगार, विद्यार्थी आणि शिक्षण यासाठी अनेक तरतूद करण्यात आल्या आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी तरुणांचा टक्का वाढवण्यासाठी उपाययोजना आणली असून त्यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी ५० कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे. 

महाराष्ट्रामध्ये सहा कौशल्य विद्यापीठांची स्थापना करण्यात येणार असल्याचेही या अर्थसंकल्पातून स्पष्ट करण्यात आले आहे. राजर्षी शाहू महाराज शिक्षणशुल्क योजनेची  मर्यादा 6 लाखावरुन वाढवून आठ लाखापर्यंत करण्यात आली आहे. स्कील इंडिया आणि कुशल महाराष्ट्र योजनेअंतर्गत राज्यातील 15 ते 25 वयोगटातील मुलांसाठी कौशल्य प्रदानाचा कार्यक्रम राबवला जाणार असल्याची माहिती यावेळी अर्थमंत्र्यांनी दिली. 

महाराष्ट्रातील शैक्षणीक पातळी सुधारण्यासाठी आंतरराष्ट्री दर्जाच्या 100 शाळा उभारण्यात येणार असून त्यासाठी नवीन मंडळ स्थापन होणार आहे. यासाठी या अर्थसंकल्पात 36 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांसाठी सरकारने पाऊल उचलले आहे. त्यासाठी परदेश रोजगार कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार आहे. शिक्षण आणि रोजगारासाठी याही तरतूदी करण्यात आल्या - 

  1. मानव विकास मिशनसाठी 350 कोटी रुपयांची तरतूद. 
  2. स्टार्टअप उदोयगांना प्रोत्साहन देण्यासाठी नविन कार्यक्रम
  3. जिल्हास्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र - 50 कोटी 
  4. मानव विकास मिशनसाठी 350 कोटी
  5.  आकांक्षित जिल्ह्यांना 121 कोटी..
  6.  विद्यार्थ्यांचं विद्यावेतन 4000 रुपयापर्यंत वाढवलं
  7. अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी 400 कोटींची तरतूद
  8. महापुरुषांचे साहित्य सलग उपलब्ध व्हावे यासाठी वेबसाईटची निर्मिती - 4 कोटींची तरतूद
  9. महानुभाव पंथाचे आद्याप्रवर्तक चक्रधर स्वामी यांच्या नावे अध्यासन केंद्र  
टॅग्स :Maharashtra Budget 2018महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१८Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारStudentविद्यार्थी