शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Bandh : पुण्यात बंदला हिंसक वळण, चांदणी चौकात दगडफेकीमुळे लाठीचार्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 16:44 IST

जिल्हाधिकारी कार्यालयापाठोपाठ चांदणी चौकातही पुणे बंदला हिंसक वळण लागले आहे. चांदणी  चौकात आंदोलकांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीनंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला आहे.

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयापाठोपाठ चांदणी चौकातही पुणे बंदला हिंसक वळण लागले आहे. चांदणी  चौकात आंदोलकांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीनंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला आहे. या भागात अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या.  

         गुरुवारी मराठा समाजाने आरक्षणासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. दोन वर्षांपूर्वी ९ ऑगस्ट रोजी क्रांतीचं औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली होती. यानंतर गेल्या दोन वर्षात मराठा समाजानं आरक्षणासाठी राज्यभरात 58 मोर्चे काढले. मात्र अद्यापही आरक्षण न मिळाल्यानं आज मराठा समाजानं 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. 

         सकाळपासून शहरात बंद शांततेत सुरु असताना अचानक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावेळी आंदोलकांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार तोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. दुसरीकडे चांदणी चौकात आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला. त्यानंतर परिसरात तणाव निर्माण होऊन पोलिसांवर दगडफेक झाली.यात तीन पोलीस किरकोळ जखमी झाले आहे. ही परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून पोलिसांनी जमाव  पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला तसेच अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. या परिसरात सध्या तणावाचे वातावरण असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे. दरम्यान शहरातून चांदणी चौकाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. कोथरूडच्या मोरे विद्यालय भागातही काही वेळापूर्वी टायर जाळण्यात आले असून बाकी सर्व भागात परिस्थिती नियंत्रणात आहे. 

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाPuneपुणे