शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

९०० बालगृहांच्या मुळावरच घाव, तुटपुंज्या अनुदानात जाचक नियमांचे पालन बंधनकारक

By यदू जोशी | Updated: April 5, 2018 05:52 IST

अनुदानाअभावी आधीच आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या राज्यातील ९०० स्वयंसेवी बालगृहांच्या थेट मुळावरच घाव घालणारा महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ लागू करीत तुटपुंज्या अनुदानात जाचक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक केल्याने बालगृहचालकांत कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.

 मुंबई - अनुदानाअभावी आधीच आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या राज्यातील ९०० स्वयंसेवी बालगृहांच्या थेट मुळावरच घाव घालणारा महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ लागू करीत तुटपुंज्या अनुदानात जाचक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक केल्याने बालगृहचालकांत कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.राज्य शासनाने अलीकडेच राजपत्र जाहीर करून केंद्रीय बाल न्याय अधिनियमाचा आधार घेत महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ लागू केला आहे. बाल न्याय अधिनियमात राज्यांना या अधिनियमाची अंमलबजावणी सुसह्य करण्यासाठी जनतेचे आक्षेप मागवून काही दुरुस्त्या करून नियम बनविण्याचे अधिकार बहाल केले आहेत. त्यानुसार, राज्य शासनाने डिसेंबर २०१७मध्ये हरकती मागविल्या. त्यानुसार, बाल कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्यांनी काही आक्षेपही नोंदविले. मात्र, त्याची दखल न घेता व कोणताही बदल न करता राज्य शासनाने केंद्रीय बाल न्याय आदर्श नियमावली २०१७चा मराठी अनुवाद करून विधी व न्याय विभागाची मान्यता घेऊन राजपत्राद्वारे राज्यात लागू केले.वास्तविक, सदरचा महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ अलीकडच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २८ मार्चला विधिमंडळात चर्चेला येणार असल्याचे कार्यक्रम पत्रिकेत असताना तत्पूर्वीच म्हणजे १४ मार्चला तो राजपत्र काढून लागू करण्यामागची सरकारची भूमिका संशयास्पद ठरते, असे बालगृहचालकांचे म्हणणे आहे. दहा आमदारांनी जरी सभागृहात या विधेयकाला विरोध केला असता तरी जाचक नियमांमध्ये बदल होऊ शकला असता. २८ मार्चला दोन्ही सभागृहांत चर्चा न होताच हे विधेयक मंजूर झाले होते.जाचक नियमांची सरबत्तीया नियमावलीतील कलमानुसार बालगृहांसाठी कर्मचारी आकृतिबंध निश्चित करण्यात आला असून ५० मुलांसाठी ३० कर्मचारी व कलम ३१ (२)नुसार बालकांच्या निवासासाठी तब्बल ८ हजार चौरस फूट जागेची इमारत बंधनकारक केले आहे. याशिवाय नियमावलीतील कलम ३२नुसार मुलांना गादी, पलंग, उशी, लोकरीची शाल, ब्लँकेट, चादर, बेडशिट, मच्छरदाणी, लोकराचे जॅकेट, चप्पल, स्पोर्ट्स शूज, स्कूल शूज, ड्रेस, शाम्पू, कोल्ड क्रीम, सुगंधी तेल, टॉवेल्स, अंतरवस्त्र, रंगीत कपडे आदी देण्याची अट घातली आहे. कलम ३५नुसार जेवणात कोंबडीचे मटण, अंडी, पनीर, दही, लोणी, सलाड आदी व नाश्त्यात सकाळी ७.३०ला दूध, उपमा, मिसळ-पाव तर सायंकाळी ४ वाजता चहा, कॉफी, सँडविच, इडली असा आहार अपेक्षित आहे.पन्नास मुलांमागे तीस कर्मचाºयांची अपेक्षा करणाºया या नियमावलीत त्या कर्मचाºयांच्या वेतनाची व आठ हजार चौरस फुटांतील इमारतीला लागणाºया भाड्याचा कुठेच साधा उल्लेख नाही. चमचमीत जेवण देण्याची अट घालताना त्यासाठी दरमहा प्रति बालक पाच ते सहा हजार रुपये भोजन अनुदानाची तरतूद करण्याचा सोईस्कर विसर नियमावली तयार करणाºयांना पडलेला दिसतो, अशी खोचक टीका संस्थाचालकांनी केली.हा तर तुघलकी प्रकारबाल कल्याण क्षेत्रात काम करणाºयांच्या किंवा सर्वसामान्यांच्या आक्षेप व हरकतींची दखल न घेता सभागृहात चर्चेविनाच ही नियमावली मंजूर करणे म्हणजे बालगृहांच्या मुळावर घाव घालण्याचा तुघलकी प्रकार आहे.- रवींद्रकुमार जाधव, बालमानस व सामाजिक समस्या विश्लेषक

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार