‘रोहित आर्या दहशतवादी नसताना त्याचे एन्काऊंटर का केले?’,  विजय वडेट्टीवार यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 13:54 IST2025-12-09T13:53:13+5:302025-12-09T13:54:27+5:30

Maharashtra Assembly Winter Session 2025: पवई इथे रोहित आर्या नामक व्यक्तीने काही मुलांना ओलिस ठेवून सरकारकडे थकीत असलेले पैसे मागितले. रोहित आर्या याचा खून का करण्यात आला? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला.

Maharashtra Assembly Winter Session 2025: 'Why was Rohit Arya encountered when he was not a terrorist?', Vijay Wadettiwar asks | ‘रोहित आर्या दहशतवादी नसताना त्याचे एन्काऊंटर का केले?’,  विजय वडेट्टीवार यांचा सवाल

‘रोहित आर्या दहशतवादी नसताना त्याचे एन्काऊंटर का केले?’,  विजय वडेट्टीवार यांचा सवाल

नागपूर – पवई इथे रोहित आर्या नामक व्यक्तीने काही मुलांना ओलिस ठेवून सरकारकडे थकीत असलेले पैसे मागितले. रोहित आर्या याचा खून का करण्यात आला? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला.

विधानसभेत आज लक्षवेधीच्या माध्यमातून रोहित आर्या प्रकरण बाबत काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी प्रश्न मांडले. आर्यांने महायुती सरकार असताना स्वच्छता मॉनिटर आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या प्रोजेक्टवर काम केले होते. त्याचे पैसे सरकारने थकवले होते. त्याने व्हिडिओ काढून सांगितले माझे पैसे द्यावे ,मी दहशतवादी नाही. अस असताना रोहित आर्यांचे एन्काऊंटर का करण्यात आले? पायावर गोळी का मारली नाही? नेमकी त्याचवेळी एन्काऊंटर स्पेशलिस्ट पोलिस कसा काय तिथे उपलब्ध होता? असे प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.

या प्रकरणी रोहित आर्या याने वारंवार आंदोलन केले,उपोषण करून पैसे मागितले होतें पण तत्कालीन मंत्र्यांनी पैसे थकवल्याने ही घटना घडली.या प्रकरणी माजी मंत्र्यांची चौकशी केली का? सरकारकडे पैसे प्रलंबित आहे का? असा प्रश्न वडेट्टीवर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला.

यावेळी उत्तर देताना मंत्र्यांनी या प्रकरणी चौकशी सुरू आहे. रोहित आर्याने लहान मुलांना ओलिस धरले म्हणून पोलिसांनी स्वरक्षणासाठी कारवाई केल्याचे स्पष्ट केले. मानवी हक्क आयोगाने समिती नेमून चौकशी करायला सांगितले त्यानुसार चौकशी सुरू आहे. यातील संबंधितावर कारवाई होईल अस आश्वासन मंत्र्यांनी दिले.

Web Title : रोहित आर्या, आतंकवादी नहीं, तो एनकाउंटर क्यों?: वडेट्टीवार

Web Summary : कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने रोहित आर्या के एनकाउंटर पर सवाल उठाए, जिसने सरकारी बकाया के लिए बच्चों को बंधक बनाया। वडेट्टीवार ने सरकार के लिए आर्या के पूर्व काम पर प्रकाश डाला और मुठभेड़ की जांच की मांग की, यह पूछते हुए कि गैर-घातक दृष्टिकोण क्यों नहीं अपनाया गया। सरकार ने घटना की जांच का आश्वासन दिया।

Web Title : Why was Rohit Arya, not a terrorist, encountered?: Vaddettiwar

Web Summary : Congress leader Vijay Vaddettiwar questions the encounter of Rohit Arya, who held children hostage over unpaid government dues. Vaddettiwar highlights Arya's prior work for the government and demands investigation into the encounter, asking why a non-lethal approach wasn't used. The government assures an ongoing inquiry into the incident.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.