शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
2
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
3
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
4
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
5
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
6
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
7
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
8
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
9
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
10
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
11
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
12
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
13
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
14
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
15
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
17
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
18
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
19
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
20
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

’सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी तीन लाख घेत आहेत’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 13:34 IST

Maharashtra Assembly Winter Session 2025: सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी अभिजित पाटील आणि गर्जे तीन लाख रुपयांची मागणी करत असून,  बीड येथील खासगी व्यक्ती अखिल पैशाची वसुली करत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केला.

नागपूर – नांदेड, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीन नाकारला जात आहे. सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी अभिजित पाटील आणि गर्जे तीन लाख रुपयांची मागणी करत असून,  बीड येथील खासगी व्यक्ती अखिल पैशाची वसुली करत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केला.

विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून काँग्रेस विधिमंडळ नेते यांनी शेतकऱ्यांचा नाकारला गेलेला सोयाबीन थेट विधानसभेत आणला. अध्यक्ष आणि मंत्र्यासमोर वडेट्टीवार यांनी पीडित शेतकऱ्यांची व्यथा मांडली. चांगल्या दर्जाचा सोयाबीन देखील जर सोयाबीन खरेदी केंद्रावर नाकारला जात असेल तर शेतकऱ्यांनी जगावे की मरावे ? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या विषयावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्यावर सरकार गांभीर्याने घेत नाही. विदर्भात अधिवेशन सुरू असताना शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

यावेळी विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत नांदेड जिल्ह्यातील गजानन टनमने, संजय सिदखेडे, भगवती किनदट, उल्हास किनदट, गजानन किनदट  या शेतकऱ्यांची व्यस्था विधानसभेत मांडली. याची दखल घेत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली. खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत पैसे घेतले जातात या आरोपाची चौकशी करण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले. चौकशी करून उपाययोजना करावी, असे विधानसभा अध्यक्ष म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Minister's aide demands bribe for soybean center: Vadettiwar alleges.

Web Summary : Vijay Vadettiwar accused a minister's OSD of demanding bribes to start soybean purchase centers, highlighting farmers' plight in Nanded and Yavatmal. He raised the issue in the Assembly, urging government action and a fair deal for struggling farmers during the Vidarbha session. An inquiry was ordered.
टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसFarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार