शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 06:09 IST

ज्या २३ जागांवर तिढा होता त्यापैकी १३ जागांवर निर्णय झाला. दहा जागांवरील तिढा कायम असल्याचे फडणवीस म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/नागपूर: महायुतीतील २८८ पैकी २७८ जागांबाबत एकमत झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दिल्लीत महायुतीच्या जागा वाटपाबाबत चर्चा केली. ज्या २३ जागांवर तिढा होता त्यापैकी १३ जागांवर निर्णय झाला. दहा जागांवरील तिढा कायम असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीहून नागपूरला परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

फडणवीस यांनी सांगितले की, भाजपची दुसरी यादी बहुदा शुक्रवारी घोषित केली जाईल. केवळ १० जागांवर तोडगा निघायचा आहे. त्या जागांबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल. महायुतीचा फॉर्म्युला त्यानंतरच घोषित करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीचे जागावाटपाचे गणित ठरायचे आहे. ८५-८५-८५ मिळून २७० जागा कशा होतात हे समजण्याचा प्रयत्न सुपर कॉम्प्युटर व गणितज्ज्ञ करत आहेत, असा चिमटादेखील त्यांनी काढला. 

दिल्लीतील बैठकीबाबत सूत्रांनी सांगितले की, दिल्लीतील बैठकीला अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही उपस्थित होते. 

महायुतीचा एकत्रित जाहीरनामा प्रसिद्ध करावा

तिन्ही पक्षांनी संयुक्तपणे प्रचार करावा तसेच एकत्रित महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध करावा, असा सल्ला शाह यांनी आजच्या बैठकीत दिला. महायुतीत एकमेकांचे उमेदवार पाडण्याची भूमिका कुठेही कोणीही घेतल्यास ते अजिबात खपवून घेऊ नका, असेही शाह यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले.

फडणवीस-बावनकुळेंची गडकरींसोबत चर्चा

- नागपुरात दाखल झाल्यानंतर रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी रवाना झाले.- तीनही नेत्यांमध्ये दुसऱ्या यादीबाबत चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने मध्य नागपूर व पश्चिम नागपूरच्या उमेदवारीवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाच दिवसांतील तिन्ही नेत्यांमधली ही दुसरी भेट आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शाहsunil tatkareसुनील तटकरे