'ऐसे वैसे कैसे कैसे हो गये'; मतदानावेळी शिंदे गटाला शायरीतून टोला; काँग्रेसच्या आमदाराचा खास अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 12:50 PM2022-07-03T12:50:38+5:302022-07-03T12:51:52+5:30

शिंदे गटाने केलं भाजपाच्या उमेदवाराला मतदान

Maharashtra Assembly Speaker Election Rahul Narvekar Eknath Shinde slammed by Congress through shayari | 'ऐसे वैसे कैसे कैसे हो गये'; मतदानावेळी शिंदे गटाला शायरीतून टोला; काँग्रेसच्या आमदाराचा खास अंदाज

'ऐसे वैसे कैसे कैसे हो गये'; मतदानावेळी शिंदे गटाला शायरीतून टोला; काँग्रेसच्या आमदाराचा खास अंदाज

Next

Eknath Shinde Trolling Shayari: राज्यातील राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यातील एका अतिशय मोठी घटना आज महाराष्ट्राने पाहिली. महाविकास आघाडीला मोठा धक्का लागला भाजपाचे अधिकृत उमेदवार असलेल्या राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रस्तावाच्या बाजूने १६४ मते पडली. तर प्रस्तावाच्या विरोधात मविआ आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना १०७ जणांनी मतदान केले. ३ जण मात्र मतदानादरम्यान तटस्थ राहिले. त्यामुळे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी प्रस्ताव संमत झाल्याची घोषणा करत नार्वेकर यांच्या नावाची घोषणा केली. शिवसेनेचा व्हिप झुगारून शिंदे गटाने थेट भाजपाच्या राहुल नार्वेकरांना मतदान केले. यावेळी काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी शायरीतून शिंदे गटाला टोला लगावला.

राज्यात गेल्या काही दिवसात अनेत अभूतपूर्व अशा स्वरूपाच्या गोष्टी घडल्या. आज राज्याच्या विधिमंडळात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. त्यासाठी सर्वच पक्षांनी व्हिप (पक्षादेश) जारी केला होते. या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांनी महाविकास आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करावे असा पक्षादेश जारी केला होता. पण शिवसेनेच्या बंडखोर गटाने हा आदेश धुडकावून लावत राहुल नार्वेकर यांना मतदान केले. आवाजी मतदानाने निर्णय घेता न आल्याने शिरगणती झाली. यावेळी जालनाचे काँग्रेसचे आमदार कैलास किसन गोरंटयाल यांनी शायरी म्हणत शिंदे गटाला टोला लगावला. "ऐसे वैसे कैसे कैसे हो गये, कैसे कैसे ऐसे वैसे हो गये" अशा शब्दांत शायरीतून त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला.

दरम्यान, शिवसेनेच्या मूळ ठाकरे गटाकडून सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केला होता. पण शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाच्या लेटरहेडवरून भरत गोगावले यांच्या स्वाक्षरीचा दुसरा व्हिप जारी करण्यात आला. पण अखेर उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी निर्णय जाहीर करताना, शिवसेनेचा सुनील प्रभू यांचा व्हिप अप्रत्यक्षपणे मान्य करत, शिंदे गटाच्या आमदारांची नावे नोदंवून घेण्यात आली.

Web Title: Maharashtra Assembly Speaker Election Rahul Narvekar Eknath Shinde slammed by Congress through shayari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.