'इस देश में रहना है, तो वंदे मातरम् कहना होगा', खडसेंचा अबू आझमींवर हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2017 02:45 PM2017-07-28T14:45:34+5:302017-07-28T14:57:34+5:30

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी वंदे मातरम् मुद्दयावरून अबू आझमींवर जोरदार हल्लाबोल केला. 

Maharashtra assembly session khadase abu azmi Vande Mataram | 'इस देश में रहना है, तो वंदे मातरम् कहना होगा', खडसेंचा अबू आझमींवर हल्लाबोल 

'इस देश में रहना है, तो वंदे मातरम् कहना होगा', खडसेंचा अबू आझमींवर हल्लाबोल 

Next
ठळक मुद्दे ‘वंदे मातरम्’ म्हणणार नाही, मग मला देशातून बाहेर काढले तरी चालेल असे वादग्रस्त विधान समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी काल केले होते. त्यानंतर आज राज्याच्या विधानसभेत ‘वंदे मातरम’चा मुद्दा चांगलाच गाजला. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी या मुद्दयावरून अबू आझमींवर जोरदार हल्लाबोल केला. देशाच्या स्वातंत्र्याची लढाई वंदे मातरम् या गीताने झाली आहे.  तर तुम्हाला आक्षेप का? मेल्यानंतर या जमिनीत पुरावं लागतं. मृत्यूनंतरही याच मातीत अत्यंसंस्कार होणार, इथलेच कफन घ्यावं लागणार, इथलीच हवा, इथलचं पाणी फुकट मिळतं मग त्या मातीला नमन करायला, या देशाला सलाम करायला काय अडचण आहे ?

मुंबई, दि. 28 - मी ‘वंदे मातरम्’चा सन्मान करतो, पण देशातील कोणताही सच्चा मुसलमान कधीही ‘वंदे मातरम्’ म्हणणार नाही, मग मला देशातून बाहेर काढले तरी चालेल असे वादग्रस्त विधान समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी काल केले होते. त्यानंतर आज राज्याच्या विधानसभेत ‘वंदे मातरम’चा मुद्दा चांगलाच गाजला. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी या मुद्दयावरून अबू आझमींवर जोरदार हल्लाबोल केला. 
काय झालं विधानसभेत- 
औचित्याच्या मुद्द्यावर भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी काल माध्यमांमध्ये वंदे मातरम् गीतासंबधी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थीत केला. या देशात राहून वंदे मातरम गायला विरोध केला जातोय. या देशात राहणाऱ्यांना वंदे मातरम म्हणावंच लागेल असं गोटे म्हणाले. यावर आझमींनी उत्तर देण्याची परवानगी मागितली. त्यावेळी सत्ताधारी आमदारांनी गोंधळ सुरू केला. अबू आझमी वेलमध्ये उतरले. दोन्ही बाजूंनी  आमदारांच्या घोषणा सुरू होत्या.  
यानंतर आझमी म्हणाले, त्यांनी इतिहासाचा दाखला दिला, देशासाठी अनेक मुस्लिमांनी बलिदान दिलं,  या देशात मोहब्बत फक्त गीत गाऊन होणार नाही. मुस्लीम आहे म्हणून विरोध का करता ? सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा हे गीत कोणी लिहले ? शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते काय ? अफजल खानाच्या भेटीवेळी शिवाजी महाराजांचे वकिल कोण होते ? इंग्रजांच्या विरोधात लढणारे टिपू सुलतान कोण होते ? त्यामुळे आम्ही देशविरोधी आहोत असं पसरवू नका, माझ्या म्हणण्याचा चुकिचा अर्थ काढला जात आहे. सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्ता हमारा, हिंदुस्थान झिंदाबादचा नारा आम्ही एकवेळ नाही तर हजारवेळा देऊ, पण वंदे मातरम म्हणणार नाही.
यानंतर एकनाथ खडसेंनी अबू आझमींवर जोरदार हल्लाबोल केला. देशाच्या स्वातंत्र्याची लढाई वंदे मातरम् या गीताने झाली आहे.  तर तुम्हाला आक्षेप का? मेल्यानंतर या जमिनीत पुरावं लागतं. जिथे तुम्ही वाढला, लहानाचं मोठं झाला,मृत्यूनंतरही याच मातीत अत्यंसंस्कार होणार, इथलेच कफन घ्यावं लागणार, इथलीच हवा, इथलेच पाणी फुकट मिळतं मग त्या मातीला नमन करायला, या देशाला सलाम करायला काय अडचण आहे ? असं म्हणत खडसे यांनी इस देश मे रहेना होगा तो वंदे मातरम् कहना होगा असं ठणकावलं. 

 


 

Web Title: Maharashtra assembly session khadase abu azmi Vande Mataram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.