शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

विधानसभेत जोर कुणाचा, महायुती की मविआ? ओपिनियन पोलमधून समोर आली धक्कादायक आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 17:24 IST

Maharashtra Assembly Election 2024: सध्याच्या राजकीय परिस्थितीत राज्यात कुणाचा विजय होऊ शकतो, याबाबत ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आलेल्या अंदाजामुळे अनेकांच्या भुवया उंचावू शकतात, अशी आकडेवारी समोर आली आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली नसली तरी राज्यामध्ये निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. एकीकडे लोकसभा निडणुकीत अनपेक्षित धक्का बसल्यानंतर सत्ताधारी महायुतीने आपली सत्ता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. तर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीने राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका ओपिनियन पोलमधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीत राज्यात कुणाचा विजय होऊ शकतो, याबाबत ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आलेल्या अंदाजामुळे अनेकांच्या भुवया उंचावू शकतात, अशी आकडेवारी समोर आली आहे. 

टाइम्स नाऊ आणि मॅट्रिझ यांनी केलेल्या या सर्व्हेमधून महाराष्ट्रात आज विधानसभेची निवडणूक झाल्यास कुणाची सत्ता येऊ शकते, याबाबत धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या ओपिनियन पोलमधील आकडेवारीनुसार राज्यात आज निवडणुका झाल्यास भाजपा पुन्हा एकदा मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, भाजपाला ९५ ते १०५ जागा मिळू शकतात. तर शिवसेना शिंदे गटाला १९ ते २४ जागा मिळू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ७ ते १२ जागांवरत समाधान मानावे लागू शकते. अशा प्रकारे महायुतीला आजच्या घडीला निवडणूक झाल्यास १२१ ते १४१ जागा मिळू शकतात. 

दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येकाँग्रेसला ४२ ते ४७ जागा मिळतील असा अंदाज या सर्व्हेमधून वर्तवण्यात आला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला २६ ते ३१ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला २३ ते २८ जागा मिळू शकतात. अशा प्रकारे सद्यस्थितीत महाविकास आघाडीला ९१ ते १०६ जागा मिळू शकतात. 

याशिवाय अपक्ष आणि  इतर पक्षांच्या खात्यामध्ये ११ ते १६ जागा जातील, अशी शक्यता या सर्व्हेमधून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील ४० ते ४२ जागांवर अत्यंत चुरशीची लढत असल्याचेही या सर्व्हेमध्ये म्हटले आहे. 

आता मतांच्या टक्केवारीबाबत या सर्व्हेमधून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार भाजपाला २५.८, शिवसेना शिंदे गटाला १४.२, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ५.२ टक्के मतं मिळतील. तर काँग्रेसला १८.६, शिवसेना ठाकरे गटाला १७.६ आणि शरद पवार गटाला ६.२ टक्के मतं मिळतील, अशी शक्यता या सर्व्हेमधून वर्तवण्यात आली आहे. याशिवाय अपक्ष आणि इतरांच्या खात्यात १२.४ टक्के जातील, असा अंदाजही या सर्व्हेमधून वर्तवण्यात आला आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाcongressकाँग्रेस