शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक

By दीपक भातुसे | Updated: October 28, 2024 06:58 IST

Maharashtra Assembly Election 2024 : काही जागांवर एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक असल्याने तिढा, मित्र पक्षांशीही वाटाघाटीबाबत गुप्तता

Maharashtra Assembly Election 2024 : मुबंई : लोकसभा निवडणुकीत अधिकृत जागा वाटप जाहीर करणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभेत मात्र जागा वाटपाचा गोंधळ अजून निस्तरता आलेला नाही. तीनही पक्षांचे राज्यातील दिग्गज नेते, दिल्लीतील काँग्रेसचे नेते जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी बेठकांवर बेैठका घेत आहेत. तिढा काही सुटलेला नाही. 

उमेदवारी अर्ज भरायला केवळ दोन दिवस शिल्लक असताना मविआचे २३ मतदारसंघातील उमेदवार जाहीर व्हायचे बाकी आहेत. काही जागांवर मित्र पक्षांत तिढा आहे. काही जागांवर एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक असल्याने ते पक्ष उमेदवार निश्चित करू शकले नाहीत. काॅंग्रेस व शरद पवार गटातील तिढा सोडवण्यासाठी रविवारी काॅंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. 

मतदार दूर जाण्याची भीती...मविआतील जागा वाटपाच्या गोंधळामुळे तीनही पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच इतर नेते संभ्रमात आहेत. याशिवाय लोकसभा निवडणुकीत मविआला मतदान करणारा मतदारही या गोंधळामुळे आमच्यापासून दूर जाईल, अशी भीती मविआतील एका नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली 

दोन जागांवर दोन पक्षांचे उमेदवार- मविआकडून आतापर्यंत जागा वाटपाचे दोन वेगवेगळे फॉर्म्युले जाहीर करण्यात आले आहेत. पहिला ८५-८५-८५ जागांचा फॉर्म्युला तीनही पक्षांच्या नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी जाहीर केला. - दुसरा ९०-९०-९० चा फॉर्म्युला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केला. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार मविआत काही जागांवर अजूनही वाद सुरू आहे. त्याबाबत मविआतील नेते काहीच बोलायला तयार नाहीत. - दुसरीकडे अशाच वादाच्या दोन जागांवर मविआच्या दोन पक्षांनी आपले उमेदवारही जाहीर केले आहेत. यात दिग्रस मतदारसंघातून काँग्रेसचे माणिकराव ठाकरे तर उद्धव सेनेचे पवन जयस्वाल आणि परांडा मतदारसंघात शरद पवार गटाचे राहुल मोटे आणि ठाकरे गटाचे राहुल पाटील यांचा समावेश आहे.आहे.

कोणते मतदारसंघ अजून कोरडे?१. सिंदखेडा, २. शिरपूर, ३. अकोला पश्चिम, ४. दर्यापूर, ५. वरूड-मोर्शी, ६. पुसद, ७. पैठण, ८. बोरिवली, ९. मुलुंड, १०. मलबार हिल, ११. कुलाबा, १२. खेड आळंदी, १३. दौंड, १४. मावळ, १५. कोथरूड, १६. औसा, १७. उमरगा, १८. माढा, १९. वाई, २०. माण, २१. सातारा, २२. मिरज, २३. खानापूर

मित्र पक्षाला सोडलेले मतदारसंघ१. भिवंडी पूर्व - सपा, २. मानखुर्द शिवाजीनगर - सपा, ३. पेण - शेकाप, ४. अलिबाग - शेकाप, ५. श्रीवर्धन - शेकाप, ६. कळवण- माकप, ७. डहाणू - माकप.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसNana Patoleनाना पटोलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार