शहरं
Join us  
Trending Stories
1
लुथरा बंधूंचे थायलंडमधून फोटो आले, पासपोर्टसह घेतले ताब्यात; कारवाईपासून वाचण्यासाठी पळाले खरे पण...
2
'एसी-थ्री टियर'मध्ये प्रवाशासोबत कुत्रा! रेल्वेतून नेता येतो का? व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे 'सेवा' झाली सक्रिय
3
FD चे व्याजदर कमी झाल्याने बॉन्डमध्ये गुंतवणूक करताय? 'हे' ५ मोठे धोके तुम्हाला माहीत असायलाच हवेत
4
"इथं येऊन तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर..."; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
सीसीटीव्ही फोटो, व्हायरल व्हॉट्सअॅप चॅट्स; DSP कल्पना वर्मांनी सांगितलं मूळ प्रकरण काय?
6
सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून विराट-रोहितचं होणार डिमोशन? BCCI देणार मोठा धक्का, तर ‘या’ खेळाडूंना मिळणार प्रमोशन
7
"मला गुन्हा कबूल नाही." राज ठाकरेंचं कोर्टात उत्तर; न्यायाधीश म्हणाले, सहकार्य करा, काय घडलं?
8
ठंडा-ठंडा, कूल-कूल! मुंबई माथेरानपेक्षा थंड, राज्यातील बहुतांशी शहरं १० अंशावर
9
Mumbai Airport: मुंबई विमानतळाला धमकीचा ईमेल, 'या' विमानांत स्फोटकं, दर अर्ध्या तासाला उडवून देणार!
10
भयंकर! पूर्वांचल एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात; कॉन्स्टेबलच्या कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
'धुरंधर' पाहून भारावला हृतिक रोशन; म्हणाला, "सिनेमाचा विद्यार्थी म्हणून खूप काही शिकलो..."
12
"पाकिस्तानात मॉल कुठून आला?", 'धुरंधर'मधील 'ती' चूक नेटकऱ्यांनी पकडली, व्हिडीओ होतोय व्हायरल
13
मार्गशीर्ष गुरुवार: पुण्याजवळील जागृत दशभुजा दत्त मंदिर: जिथे 'नास्तिक' अधिकारी झाला दत्तभक्त!
14
मिस्ड कॉलने सुरू झालेली प्रेम कहाणी... दोनदा लग्न, दोनदा घटस्फोट, 'हलाला' आणि आता थेट लैंगिक शोषणाची तक्रार!
15
मुलांचे शिक्षण-लग्नासाठी गुंतवणूक करताय? महागाईमुळे तुमच्या बचतीची किंमत किती घटते? वाचा संपूर्ण गणित
16
हनुमानगढमध्ये मोठा हिंसाचार! इथेनॉल फॅक्टरीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा उद्रेक; १६ वाहनांना आग, काँग्रेसचे आमदार जखमी
17
दहशतवादी कृत्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी पडघ्यातील बोरिवली गावात रात्रभर ED, ATS ची छापेमारी
18
Sovereign Gold Bond: ₹२,९५४ च्या गुंतवणूकीवर ₹१२,८०१ चा रिटर्न; गुंतवणूकदारांना कुठे मिळतोय ४ पट पैसा, जाणून घ्या
19
‘क्रिकेटएवढं मला काहीही प्रिय नाही’; लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाची पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी
20
टॅरिफ वॉरचे नवे संकट! आधी अमेरिका, आता मेक्सिकोचा ५०% टॅरिफ हल्ला; भारत-चीनसह अनेक देशांना मोठा झटका
Daily Top 2Weekly Top 5

ज्या माणसानं 'घड्याळ' बनवलं त्यानं सेल काढून टाकलेत; रोहित पाटील विरोधकांवर कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 15:47 IST

तुम्ही मला काम करण्याची संधी दिली तर इथल्या माता भगिनी सुरक्षित राहतील याची हमी मी देईन असं रोहित पाटील म्हणाले. 

सांगली - ज्या बारामतीत घड्याळाचा जन्म झाला तिथे लोकसभेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाला ४८ हजारांचं मताधिक्य आहे. ज्या माणसानं घड्याळ बनवलं, त्या माणसानं घड्याळाचे सेल काढून टाकलेत त्यामुळे कुणी काळजी करू नका. आज शरद पवारांना आपल्या ताकदीची गरज आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे दाखवतायेत. तो स्वाभिमान टिकवण्यासाठी पुढचे २० दिवस घरात न राहता घरोघरी तुतारी वाजवणारा माणूस पोहचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे असं आवाहन कार्यकर्त्यांना करत रोहित पाटील यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. 

तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात रोहित पाटील यांनी मविआकडून उमेदवारी अर्ज भरला. या मतदारसंघात माजी खासदार संजयकाका पाटीलअजित पवारांच्या राष्ट्रवादीतून रिंगणात उतरणार आहेत. आज रोहित पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरत जाहीर सभा घेतली. त्या सभेत ते म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर मी अर्ज भरला आहे. ३०-३५ वर्ष राजकारणात असणारे कुठलेही काम सांगायचं सारखे नाही, त्यात कुठलाही पक्ष तिकिट द्यायला तयार नाही. त्यामुळे आपण घड्याळाकडे जावूया. आबांमुळे या मतदारसंघात घड्याळ रुजलं आहे. थोडीफार मते त्यातून त्यांना मिळतील. तुम्ही मला काम करण्याची संधी दिली तर इथल्या माता भगिनी सुरक्षित राहतील याची हमी मी देईन, ज्यारितीने आबांनी यांची गुंडगिरी हद्दपार करून दाखवली तसं मी यांची गुंडगिरी हद्दपार करून दाखवेन हा शब्द मी देतो असं त्यांनी म्हटलं.

तसेच २०१९ च्या निवडणुकीत प्रचार करताना ११० कोटी आकडा मला जास्त वाटायचा, पण मविआ सरकार असताना सव्वा २ वर्षात ८५० कोटींची कामे या मतदारसंघात आपण केली आहेत. या मतदारसंघात एमआयडीसी मंजूर करण्याचं काम आम्ही केले. लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात उद्याच्या काळात मविआ सरकार येणार हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. तुम्हाला ८५० कोटी आकडा लहान वाटेल इतकी कामे आम्ही करू. रोहितदादांनी कर्जत जामखेडला ३ हजार कोटींची कामे केली असं आम्हाला ऐकायला मिळालं. पुढच्या काळात कर्जत जामखेडसोबत तासगाव कवठेमहांकाळ नाव त्या यादीत येईल याची खात्री देतो असा विश्वास रोहित पाटील यांनी सभेत व्यक्त केला. 

दरम्यान, मी दिल्लीला १७ वेळा गेलो, येणाजाण्याची तिकिटे पुरावा म्हणून काढून ठेवली. नितीन गडकरींना भेटून तासगावचा रिंगरोड मंजूर करून घेतला. इथे रिंगरोडवर कुणी बोलावं याची वाटच मी पाहतोय. या मतदारसंघात एक इंचही जमीन अनधिकृतपणे कुणाच्या नावावर होऊ देणार नाही असा शब्द मी देतो. सर्वसामान्यांना त्रास देणारा अजून जन्माला यायचाय हे पुढच्या ५ वर्षाच्या कारकि‍र्दीत दाखवून देईन. ज्या ग्रामपंचायतीतून विरोधक कारभार करतात त्यात आजही आबांचा फोटो आहे. आमदार असताना, खासदार असताना तुम्ही तुमच्या १५ वर्षाची कामे सांगायची आणि मी माझ्या ५ वर्षाची कामे सांगायची, खुल्या व्यासपीठावर मी चर्चा करायला तयार आहे असं आव्हान रोहित पाटील यांनी संजयकाका पाटील यांना दिले आहे.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४tasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Rohit Patilरोहित पाटिलsanjaykaka patilसंजयकाका पाटीलAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस