शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बॅलेट पेपरवर मतदान घेतल्यास आमची राजीनाम्याची तयारी, नाना पटोले यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 15:56 IST

Maharashtra Assembly Election 2024 Result: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मरकडवाडी गावाने मतदानाची सत्यता पडताळण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची घोषणा केल्याने वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मरकडवाडीला भेट दिली.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला दणदणीत विजय मिळाल्यापासून विरोधकांकडून सातत्याने या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तसेच इव्हीएमवर शंका घेतली जात आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मरकडवाडी गावाने मतदानाची सत्यता पडताळण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची घोषणा केल्याने वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मरकडवाडीला भेट दिली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेत असल्याचा आमचीही राजीनाम्याची तयारी आहे, असं मोठं विधान केलं आहे. 

नाना पटोले म्हणाले की, भाजपावाले राजीनामे द्यायचं आव्हान देत आहेत. उत्तमराव जानकर यांनी सांगितलंय आणि मीसुद्धा सांगतो की, जर निवडणूक आयोगाने इव्हीएमवर मतदान न घेता बॅलेट पेपरवर मतदान घेऊ असं जाहीर केलं तर आम्ही राजीनामा देण्यास तयार आहोत. मात्र निवडणूक आयोग बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास तयार असल्याचं त्यांनी लिहून आणावं, असं प्रतिआव्हान नाना पटोले यांनी दिलं. 

ते पुढे म्हणाले की,  बाकी निवडणूक आयोग कुणाची कठपुतळी झाला आहे हे सर्वांना माहिती आहे. एका रात्रीत ७६ लाख मतं कशी वाढली, याचं उत्तर निवडणूक आयोग का देत नाही. सत्ता येईल आणि जाईल, पण लोकशाही टिकली तर सर्व काही राहील, हे लक्षात ठेवलं पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nana Patoleनाना पटोलेmalshiras-acमाळशिरसEVM Machineईव्हीएम मशीनElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग