शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 08:43 IST

Maharashtra Assembly Election 2024 : कन्हेरी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी मंगळवारी आयोजित सभेत शरद पवार बोलत होते.

Maharashtra Assembly Election 2024 : काटेवाडी (बारामती) : मी घर फोडल्याची भाषा काल इथे झाली. ही मोठी गंमतीची गोष्ट आहे. घर मोडणे हा माझा स्वभाव नाही. पवार कुटुंबातील मी वडीलधारी आहे. नेहमीच मी कुटुंब एकत्र कसे राहील हे  पाहिले. माझ्या आई-वडील, भावांनी मला कधी घर फोडायचे पाप शिकवले नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घणाघात केला.

कन्हेरी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी मंगळवारी आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. कुटुंबातील वडीलधारी म्हणून माझ्या कुटुंबात माझे सगळे ऐकतात. मी राजकारण करत असताना अन्य भावांना शेती, उद्योग धद्यांसाठी मदत केली. त्यांच्या आशीर्वादानेच मी आजवर राजकारण करू शकलो. मी राज्य चालवायची जबाबदारी घेत सगळा कारभार त्यांच्या हाती दिला. राष्ट्रवादी काँग्रेस   पक्षाचा अध्यक्ष मी होतो, मात्र नव्या पिढीकडे सगळे अधिकार दिले. गेली २० वर्षे मी बारामतीत लक्ष घातलेले नाही.

चारवेळा उपमुख्यमंत्री पदाची संधी दिली. तरी त्यांनी पहाटे सहालाच तिकडे जात शपथ घेतली. अनेकांना झोपेतून उठवून तिकडे नेले. परिणाम काय झाला, अवघ्या चार दिवसांत पद गेले. नंतरच्या काळात तर पक्षच घेऊन दुसरीकडे जाऊन बसले. त्यातून त्यांना पद मिळाले. पण याआधीसुद्धा मिळाले होतेच ना, असे शरद पवार म्हणाले.  मी राज्यात आजवर अनेकांना मंत्री केले. उपमुख्यमंत्री केले. परंतु, एकदाही सुप्रियाला पद दिले नाही. बाकीच्यांना वेगवेगळी पदे दिली. बारामतीत ‘मलिदा गँग’चा वारंवार उल्लेख होतो आहे. पण मी अशा गँग कधीही निर्माण केल्या नाहीत, असा टोलादेखील शरद पवार यांनी यावेळी अजित पवारयांना लगावला.  

नक्कल केली आणि हशा पिकलासहा महिन्यांपूर्वी सुप्रियाची लोकसभेची निवडणूक होती. सुनेत्रा त्यांच्या विरोधात उभ्या राहिल्या. त्यावेळची त्यांची भाषणे बघा. त्यावेळी, समोरचे लोक भावनेला हात घालतील. तुम्हाला भावनाप्रधान करतील. डोळ्यात पाणी आणून मते द्या म्हणतील, पण तुम्ही बळी पडू नका, असे आवाहन करण्यात आले होते.बरोबर ना? पण कालचे भाषण तुम्ही ऐकले का, असे म्हणत शरद पवार यांनी चष्मा काढत डोळ्यावरून रुमाल फिरवित अजित पवार यांची यावेळी  नक्कल केली. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

माझा पक्ष व चिन्ह पळवलेपक्ष मी काढला, चिन्ह माझे होते. काही लोकांनी वेगळा विचार केला. माझ्या आयुष्यात मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो. ती वेळ त्यांनी आणली. शरद गोविंदराव पवार या नावाने मला पहिल्यांदा समन्स आले. केंद्र त्यांच्या हातात होते.कोर्टानेही पक्ष व चिन्ह त्या मंडळींचे असल्याचे सांगितले. ही मोठी गमतीची गोष्ट घडली. माझा पक्ष व चिन्ह पळवले. पण जनतेच्या आग्रहाखातर मी पुन्हा जोराने मोट बांधल्याचे पवार म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारbaramati-acबारामतीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024