शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 13:40 IST

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आता प्राण्यांचीही एंट्री झाली आहे. शरद पवारांबाबत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या सदाभाऊ खोत यांचा उल्लेख संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचा कुत्रा असा केला होता. त्यानंतर आता भाजपा नेत्यांनीही संजय राऊत यांना प्राण्यांची उपमा देण्यास सुरुवात केली आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता धार चढू लागली असून, नेतेमंडळी एकमेकांवर बोचऱ्या शब्दांत टीका करत आहेत. त्यात काल शरद पवार यांच्यावर टीका करताना शेतकरी नेते शरद पवार यांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याने वादाला तोंड फुटलं आहे. या विधानावरून  विरोधी पक्षांसह महायुतीमधील अजित पवार गटामधील नेत्यांनीही सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता या वादात प्राण्यांचीही एंट्री झाली आहे. शरद पवारांबाबत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या सदाभाऊ खोत यांचा उल्लेख संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचा कुत्रा असा केला होता. त्यानंतर आता भाजपा नेत्यांनीही संजय राऊत यांना प्राण्यांची उपमा देण्यास सुरुवात केली आहे. 

संजय राऊत सदाभाऊ खोत यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस यांचे दोन दोन कुत्रे आहेत. ते नेहमी अशा घाणेरड्या पद्धतीने भुंकत असतात. देवेंद्र फडणवीस यांचे बगलबच्चे कोण आहेत, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता देवेंद्र फडणवीस यांचा द्वेष करते. आधी गोपिचंद पडळकर म्हणून कुणीतरी होतं, आता हे सदाभाऊ खोत आलेत. त्यांची लायकी काय आहे, त्यांनी राजकारणात काय केलं आहे, असा सवालही संजय राऊत यांनी विचारला होता. 

संजय राऊत यांच्या या विधानावर पलटवार करताना नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत हे  उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे पाळीव कुत्रेच आहेत. त्यांना टॉमी म्हणतात. पण कुत्रा तरी बरा, तो निष्ठावान असतो. पण संजय राऊत हे साप आहेत. सापाला दूध पाजलं तरी कधीतरी तो आपल्याच मालकाला डसतो, अशी टीका नितेश राणे यांनी केली. 

तर सदाभाऊ खोत यांनीही संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. ते म्हणाले की,  संजय राऊतांमध्ये कुत्र्याएवढा इमानदार पणा असता तर महाराष्ट्रानं त्यांचं कौतुक केलं असतं. मला संजय राऊतांवर काही बोलायचं नाही. कारण डुकराला कितीही साबण, शाम्पू लावला तरी डुक्कर हा गटारातच जातो, असे विधान सदाभाऊ खोत यांनी केलं.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sadabhau Khotसदाभाउ खोत Sanjay Rautसंजय राऊतNitesh Raneनीतेश राणे MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी