शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"विधानसभा निवडणुकीत मविआ दोन तृतियांश बहुमताने विजयी होईल आणि सरकार स्थापन करेल’’, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केला विश्वास  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 18:02 IST

Maharashtra Assembly Election 2024: लोकसभेला महाराष्ट्रातील जनतेने भाजपा आणि महायुतीला धडा शिकवला आहे आता विधासभा निवडणुकीत महाविकास आघाडी २/३ बहुमताने विजयी होऊन सरकार बनवेल, असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांनी व्यक्त केला आहे. 

बुलढाणा -  देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत, पण महाभ्रष्ट महायुती सरकार शेतक-यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही, शेतमालाला एमएसपी नाही. डॉ. मनमोहनसिंह सरकारने शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते पण केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही. महागाई व बेरोजगारी नियंत्रणाचा कार्यक्रम या सरकारकडे नाही. लोकसभेला महाराष्ट्रातील जनतेने भाजपा आणि महायुतीलाधडा शिकवला आहे आता विधासभा निवडणुकीत महाविकास आघाडी २/३ बहुमताने विजयी होऊन सरकार बनवेल, असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे. 

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला राज्यातील वरिष्ठ नेत्यांसह विदर्भ दौ-यावर असून ते विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत आहेत. आज बुलढाणा येथे बुलढाणा, अकोला आणि वाशीम जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री अनिस अहमद, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, वाशीम जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. अमित झनक, अकोला काँग्रेसचे अध्यक्ष अशोक अमानकर अकोला शहर काँग्रेसचे अध्य डॉ. प्रशांत वानखेडे, आमदार राजेश एकडे, आ. धीरज लिंगाडे, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, संजय राठोड, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख, यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना चेन्नीथला पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने वक्फ सुधारणा विधेयक आणले पण ते विधेयक अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी बनवलेले नाही. ते अल्पसंख्यांकांच्या विरोधात आहे. सरकारने कोणाशीही चर्चा न करता, अल्पंसख्यांकांच्या भावनांचा विचार न करता, मुस्लीम समाजाचा विरोध असताना आणले आहे. लोकसभेत या विधेयकाला विरोध झाल्याने ते जेपीसीकडे पाठवावे लागले. केंद्रातले सरकार जनभावनेच्या विरोधात ठरावीक लोकांच्या हितासाठी काम करत आहे. यावेळी बोलताना विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मविआला मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय आहे. मराठवाड्यातील आढावा बैठकांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारच्या विरोधातही जनतेत प्रचंड रोष असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ज्यांच्या मागे चौकश्या लागल्या होत्या तेच लोक सरकारमध्ये सहभागी झालेले आहेत आणि सरकार भ्रष्ट मार्गाने सुरु आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे, अंमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण तरुणांमध्ये वाढले आहे. महायुती सरकार जनतेसाठी नाही तर सत्तेसाठी काम करत आहे. या सरकारला बहिण नाही तर सत्ता लाडकी आहे. जनताच आता या सरकारला पायउतार करणार आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाMahayutiमहायुतीMaharashtraमहाराष्ट्र