शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

"मेरे पास माँ है!’’, अजित पवार यांच्याकडून आईसोबतचा फोटो ट्विट करत दिवाळीच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 14:31 IST

Maharashtra Assembly Election 2024: पक्ष आणि कुटुंबात पडलेल्या फुटीसाठी जबाबदार धरत अजित पवार यांच्यावर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी आईसोबतचा फोटो शेअर करत सूचक संदेश दिला आहे. 

अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबामध्ये फूट पडली होती. या फुटीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवार कुटुंबीय पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या नणंद भावजयीमध्ये लढत झाल्यानंतर आता  विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या अशी लढत रंगणार आहे. येथे काका अजित पवार यांच्याविरुद्ध  शरद पवार गटाकडून अजितदादांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच पक्ष आणि कुटुंबात पडलेल्या फुटीसाठी जबाबदार धरत अजित पवार यांच्यावर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी आईसोबतचा फोटो शेअर करत सूचक संदेश दिला आहे. 

अजित पवार यांनी आईसोबतचा फोटो ट्विट करत राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. माझ्या आणि आईच्या वतीने महाराष्ट्रातील मायमाऊली, शेतकरी, कष्टकरी, युवक - युवती आणि ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे, असे अजित पवार यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये अजित पवार यांच्यासमोर युगेंद्र पवार यांचं आव्हान असलं तरी त्यांचा खरा सामना हा शरद पवार यांच्याशीच होणार आहे. याआधी लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली होती. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसFamilyपरिवार