शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 19:34 IST

महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात महायुतीत 276 जागांवर बोलणी पूर्ण झाली आहेत, परंतु अद्याप सुमारे 12 जागांचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळेच अद्याप महायुतीने आपले जागावाटप जाहीर केलेले नाही. दरम्यान, गुरुवारी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सुमारे 25 जागांचा वाद मिटल्याची माहिती आहे. उर्वरित जागांपैकी काहींवर भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यात रस्सीखेच सुरू आहे, तर काहींवर भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात चर्चा सुरू आहे. याशिवाय 4 ते 5 जागा अशा आहेत ज्यावर भाजप, शिवसेना आणि अजित राष्ट्रवादी तिघांनी दावा केला आहे. 

12 जागांवर अजूनही वाद कायमपालघर, बोईसर, वसई, नालासोपारा याबाबत भाजप आणि शिवसेना यांच्यात अद्याप एकमत होऊ शकलेले नाही, तर बडगाव शेरी, आष्टी आणि तासगावच्या जागांवर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये एकमत झाले नाही. या जागांसाठीचे उमेदवार परस्पर संमतीने ठरवावेत, उमेदवारांची संख्याबळ आणि त्यांच्या विजयाची प्रबळ शक्यता लक्षात घेऊन उमेदवार निश्चित करावेत, अशा सूचना गृहमंत्र्यांनी दिल्या आहेत.

असा असेल जागावाटपाचा फॉर्म्युमलामीडिया रिपोर्ट्सनुसार, महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. भाजप सुमारे 155/156 जागांवर, शिवसेना सुमारे 82/83 जागांवर आणि राष्ट्रवादी 50/51 जागांवर निवडणूक लढवणार आहे. मात्र, राज्यातील 31 विधानसभा जागांबाबत महायुती चिंतेत आहे. महायुतीसमोर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई उपनगरच्या जागा आहेत, जिथे महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत आघाडी घेतली होती.

गेल्या विधानसभा (2019) च्या आकडेवारीवर नजर टाकली तर, महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांपैकी 31 जागा अशा होत्या, जिथे विजय आणि पराभवाचा फरक पाच हजार मतांपेक्षा कमी होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निकराच्या लढतीत या 31 पैकी महायुतीने 15 तर महाविकास आघाडीने 16 जागा जिंकल्या होत्या. यावेळी विधानसभा निवडणुकीत या जागांवर महायुतीचा आकडा सुधारण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

त्या 31 जागा कोणत्या?2019 मध्ये 31 जागा होत्या ज्यांवर कडवी स्पर्धा होती. त्यात धुळे, नेवासा, भोकरदन, पुसद, रामटेक, हदगाव, भोकर, नयागाव, देगलर, मुखेड, उदगीर, अहमदपूर, सोलापूर मध्य, शिरोळ, कराड उत्तर, कराड दक्षिण, सांगोला, महाडी, पुणे कँट, मावळ, चेंबूर, चांदिवली, माजलगाव, भांडुप, मालाड पश्चिम, दिंडोसी, नाशिक मध्य, डहाणू आणि धुळे शहराचा समावेश आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस