शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
7
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
8
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
9
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
10
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
11
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
12
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
13
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
14
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
15
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
16
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
18
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
19
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा

लाडक्या बहिणींना २१०० रुपये, २५ लाख नवीन नोकऱ्या...; भाजपच्या संकल्प पत्रात काय-काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 12:11 IST

Maharashtra Assembly Election 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित भाजपने हे संकल्प पत्र जारी केले आहे. या संकल्प पत्रात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु आहे.या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रविवारी (दि.१०) आपले संकल्प पत्र म्हणजेच निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित भाजपने हे संकल्प पत्र जारी केले आहे. या संकल्प पत्रात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, आशिष शेलार उपस्थित होते.

आज १० नोव्हेंबरच्या दिवशीच छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला पराभूत केले होते, त्याच शिवशक्तिच्या प्रेरणेने काम करणारे नेते हा अर्थसंकल्प सादर करत आहेत, असे सांगत भाजपकडून या पत्रकार परिषदेची सुरूवात करण्यात आली. यावेळी  संकल्प पत्र हे आकांक्षांचे प्रतिबिंब आहे, असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले. तसेच, भाजप सरकारने मागच्या दहा वर्षात मोठी कामे केली आहेत, असे सांगत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंसह शरद पवार आणि काँग्रेसवरही निशाणा साधला. 

आघाडी सरकारच्या काळात जनतेला खूप त्रास सहन करावा लागला, असे अमित शाह म्हणाले. तसेच, जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द होईल, यावर कोणाचाही विश्वास नव्हता. पण आज एनडीए सरकारने कलम ३७० रद्द करण्याचे काम केले आहे. आम्ही समृद्ध भारताचे वचन दिले होते. १० वर्षात आम्ही देशाची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर नेली. आमचे वचन आहे की,  २०२७ मध्ये आम्ही भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवू, असे अमित शाह यांनी सांगितले.

महायुतीची महत्त्वाकांशी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आता लाडक्या बहिणींना १५०० नाही तर २१०० रुपये देणार, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच, हे संकल्पपत्र म्हणजे विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र तयार करण्याचा रोडमॅप आहे, २०१४ मध्ये जे संकल्पपत्र जाहीर केलं होतं, २०१९ च्या निवडणुकांना सामोरे जाताना त्या संकल्पपत्रातील कोणत्या गोष्टी पूर्ण केला, याचा रिपोर्ट दिला होता. त्यामुळे भाजपकरिता किंवा महबायुतीसाठी संकल्पपत्र म्हणजे फक्त कागदी डॉक्युमेंट नाही, तर त्या दिशेने काम करण्यासाठी एक अतिशय पवित्र अशा प्रकारचं डॉक्युमेंट आहे. राज्यातील जनतेचा विश्वास महायुतीवर आहे, असे देंवेद्र फडणवीस म्हणाले. 

भाजपच्या संकल्पपत्रात काय-काय आहे?- लाडक्या बहिणींना पुढील काळात १५०० ऐवजी २१०० रुपये देणार- शेतकऱ्यांसाठी भावान्तर योजना (हमीभावाने खरेदी होणार नाही, त्याठिकाणी फरकाची रक्कम खात्यात टाकणार)- शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार- प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवाऱ्याचा हक्क- वृद्धांची पेन्शन २१०० (सहायतेच्या योजनांमध्ये वाढ करणार)- जीवनावश्यक वस्तुंचे भाव स्थिर ठेवणार- २५ लाख रोजगारांची निर्मिती - १० लाख विद्यार्थ्यांना वेतन- गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी सौरचा वापर करुन ३० टक्के कमी करणार-विज्ञान तंत्रज्ञान : मेक इन महाराष्ट्राला प्रभावीपणे राबवणार- महाराष्ट्राला फिनटेक आणि एआयचं हब करू- एअरोनॉटिकल आणि स्पेसमध्ये उत्पादनावर काम करू- अक्षय अन्न योजना- महारथी : एआय लॅब्स- कौशल्य जनगणना करणार - छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र- हमी भावापेक्षा कमी भावात खरेदी करत असेल तर भावात्तम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणार- अडीच वर्षांमध्ये १ लाखापेक्षा जास्त सरकारी नोकऱ्या दिल्या.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रAmit Shahअमित शाहDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस