शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

महायुतीच्या नेत्यांची धडपड, फैसला आज, शिंदे- फडणवीस यांच्यात चार तास खलबते

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 07:01 IST

Maharashtra Assembly Election 2024: महायुतीतील बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावेत यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी प्रचंड धडपड चालविली असून त्याचा काय परिणाम होतो हे सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होईल.  पुणे, मराठवाडा आणि विदर्भात भाजपच्या बंडखोरांनी पक्षाची डोकेदुखी वाढविली आहे.

मुंबई - महायुतीतील बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावेत यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी प्रचंड धडपड चालविली असून त्याचा काय परिणाम होतो हे सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होईल.  पुणे, मराठवाडा आणि विदर्भात भाजपच्या बंडखोरांनी पक्षाची डोकेदुखी वाढविली आहे. मात्र, आमचे ९० टक्के बंडखोर माघार घेतील असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.शिंदेसेनेविरोधात भाजपचे ९ बंडखोर मैदानात आहेत. तर भाजपविरोधात शिंदेसेनेच्या ९ जणांनी अर्ज भरले आहेत. राष्ट्रवादीविरोधात शिंदे गटातील ७ जणांनी अर्ज भरलेत.

आर्वीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती सुमित वानखेडे यांच्याविरुद्ध बंड करणारे आ. दादाराव केचे यांनी माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्याआधी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे त्यांना घेऊन अहमदाबादला गेले आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घडवून आणली. मुंबईच्या बोरीवलीत माजी खासदार गोपाळ शेट्टी हे सोमवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी त्यांच्याशी चर्चा करून मन वळविण्याचा प्रयत्न केला. मी पक्ष सोडणार नाही, मी पक्षाचे नुकसानही करणार नाही असा शब्द शेट्टी यांनी दिला असल्याचा दावा तावडे यांनी एक्सवरून केला. पण आपण लढणार असल्याचे म्हणत शेट्टी यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे.

माहीमवरून बराच खल माहीममध्ये शिंदेसेनेचे सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी की नाही यावर बराच खल झाल्याचे समजते. किमान दहा मोठ्या बंडखोरांना स्वत: शिंदे अन् फडणवीस यांनी तिथूनच फोन केल्याचे सूत्रांनी सांगितले.

गायकवाड यांची माघार  - लातूर जिल्ह्यातील उदगीर मतदारसंघातून बंडखोरी करणारे भाजपचे विश्वजित गायकवाड यांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे रविवारी जाहीर केले. अमरावतीतील अचलपूर, बडनेरा, अमरावती, तिवसा मतदारसंघांत  भाजपमध्ये मोठी बंडखोरी आहे. - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात वर्षावर ४ तास खलबते झाली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस