शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 18:34 IST

Maharashtra Assembly Election 2024: शिवसंग्राम संघटनेचे नेते दिवंगत विनायक मेटे यांचे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.त्या बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बीड जिल्ह्यात मोठी खेळी केली आहे. शिवसंग्राम संघटनेचे नेते दिवंगत विनायक मेटे यांचे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ज्योती मेटे यांना पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व देऊन स्वागत करण्यात आले. दरम्यान, ज्योती मेटे यांच्या शरद पवार गटातील प्रवेशामुळे बीड जिल्ह्यामधील राजकीय समिकरणं बदलण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ज्योती मेटे म्हणाल्या की, हा पक्षप्रवेश करण्यामागे विधानसभा निवडणुकीचंच कारण आहे. विधानसभा निवडणूक म्हणजे राजकारण आणि समाजकारण. आमची जी संघटना आहे ती समाजकारण करते. तिचं उद्दिष्ट हे समाजकारण आहे. समाजकारण करत असताना त्याला राजकारणाची जोड देण्यासाठी हा पक्षप्रवेश केला आहे. मी बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मी प्रस्ताव मांडलेला आहे. तसेच पक्षाशी चांगली चर्चा झालेली असल्याने आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुढे जात असताना पक्षाने दिलेली जबाबदारी शिवसंग्राम संघटना सक्षमतेने पार पाडेल, असेही त्यानी सांगितले.

विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम संघटनेचं नेतृत्व स्वीकारणाऱ्या ज्योती मेटे या लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यावेळी त्यांनी या निर्णयापासून माघार घेतली होती. दरम्यान विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर ज्योती मेटे ह्यांची विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती. तसेच त्या बीड विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यात विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी सातत्याने आग्रही भूमिका घेतलेली असल्याने त्याचाही प्रभाव या भागात पडण्याची शक्यता आहे. आता शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी मिळणार का? तसेच उमेदवारी मिळाल्यास त्या कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.    

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४beed-acबीडNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारMaratha Reservationमराठा आरक्षण