शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 16:20 IST

राज्यातील राजकारणात सध्या विविध चर्चांना जोर आला आहे. त्यात प्रामुख्याने निकालानंतर काय घडणार याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

पुणे - राज्याच्या राजकारणात २०१९ नंतरचा राजकीय प्रयोग २०२४ च्या निकालानंतरही घडू शकतो का अशी कुजबुज सुरू झाली आहे. यामागचं कारण म्हणजे अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार किंगमेकर ठरतील. निकालानंतर काहीही घडू शकते असं विधान केले होते. परंतु आता पुन्हा एकदा अजित पवार गटाच्या एका नेत्याने केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पडद्यामागे सत्तेची समीकरण जुळवली जातायेत का असा प्रश्न पडला आहे.

राष्ट्रवादी नेते, मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, पुढचं काही सांगणे आता कठीण आहे. एका बाजूला आघाडी, दुसऱ्या बाजूला युती आहे. दोन्हीकडे ३-३ पक्ष आहेत. उद्या आघाडी सरकार येते की युती सरकार हे थोडावेळ बाजूला ठेवू, पण प्रत्येक पक्षाचे किती आमदार निवडून येतील हे पाहावे लागेल. त्यानंतर त्याचे खरे गणित जुळवले जाईल. त्यात कदाचित निवडणुकीच्या निकालानंतर काही समीकरणे बदलूही शकतात असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. 

तसेच निकालानंतर बहुमताचं गणित जुळत नसेल तर सरकार आणण्यासाठी गणित जुळवावे लागेलच. काही ना काही करावे लागेल. ६ पक्ष आहेत. केवळ २-३ पक्ष नाहीत. त्यामुळे ६ पक्षांचं गणित जुळवण्यासाठी भरपूर वाव आहे असं सूचक विधान दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. त्यामुळे २०२४ च्या निकालानंतरही अनेक समीकरण नव्याने उदयास येतील का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

नवाब मलिक काय म्हणाले होते?

२०१९ च्या निकालानंतर काय घडेल याचा अंदाज कुणी बांधला होता का, २०२४ च्या निकालानंतरही काही घडू शकते. अजित पवार किंगमेकर राहतील अशी खात्री आहे. मी जास्त भविष्यवाणी करू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला चांगल्या जागा मिळतील. आताच्या घडीला ही लढाई काटे की टक्कर अशी आहे. मोठा संघर्ष होणार आहे. सरकार कुणाचं येईल असा दावा कुणी करू शकत नाही. प्रचार जसजसा पुढे सरकत जाईल त्या परिस्थितीनुसार पुढे बघू असं असं विधान नवाब मलिकांनी केले होते. 

त्याशिवाय विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाचेच सरकार येईल किंवा अजित पवार भाजपाबरोबरच असतील, हे आताच सांगणे कठीण आहे. या निकालानंतर कोण कोणाच्या बरोबर असेल हे सांगताच येत नाही. आता काही लोक सांगत आहेत की, एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचे काही तरी चालले आहे. अशी वेगवेगळी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे असा दावाही मलिकांनी केला होता. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीAjit Pawarअजित पवारDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलnawab malikनवाब मलिक