शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
4
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
5
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
6
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
7
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
8
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
9
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
10
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
11
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
12
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
13
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
14
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
15
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
16
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
17
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
18
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
19
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 19:27 IST

या सारख्या नावांमुळे मतदारांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अनेक बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतले, तर काहीजण बंडखोरीवर कायम आहेत. या बंडखोरांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे. बंडखोरांसोबतच सारख्या नावाच्या उमेदवारांमुळेही महायुती आणि मविआचा त्रास वाढणार आहे. काही जागांवर तर सारखे नाव असलेले तीन-तीन अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. या नावांमुळे मतदारांचा गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पर्वतीपुणे जिल्ह्यातील पर्वती जागेवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) महायुतीच्या वतीने माधुरी मिसाळ यांना उमेदवारी दिली आहे, तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीच्या वतीने अश्विनी कदम यांना मैदानात उतरवले आहे. या चुरशीच्या लढतीत अश्विनी कदम नावाच्या तीन अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत.

इंदापूरपुणे जिल्ह्यातील इंद्रापूर विधानसभेसाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्तात्रेय भरणे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटील निवडणूक रिंगणात आहेत. या जागेवर हर्षवर्धन पाटील नावाचे दोन, तर दत्तात्रेय भरणे नावाचा एक अपक्ष निवडणूक लढवत आहे.

वडगाव शेरीपुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) ने बापूसाहेब तुकाराम पठारे यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवर बापू बबन पठारे नावाच्या व्यक्तीने अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. राष्ट्रवादीच्या (एसपी) उमेदवाराने त्या अपक्ष उमेदवाराचा अर्ज नाकारण्याची मागणीही निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती, मात्र मागणी अमान्य झाली.

दापोली रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभेच्या जागेवर शिवसेनेच्या दोन गटात लढत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने योगेश कदम यांना तिकीट दिले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उबाठा गटातून संजय कदम उमेदवार आहेत. या जागेवर 6 उमेदवारांचे आडनाव कदम आहे. त्यापैकी तीन योगेश कदम आणि तीन संजय कदम नावाचे उमेदवार आहेत.

कोरेगाव सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभेच्या जागेवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे महेश संभाजीराजे शिंदे आणि राष्ट्रवादीचे (सपा) शशिकांत शिंदे यांच्यात लढत आहे. या जागेवर महेश नावाचे तीन उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. या अपक्षांपैकी महेश माधव शिंदे आणि महेश सखाराम शिंदे अशी दोन अपक्षांची नावे आहेत, तर महेश माधव कांबळे असे एका उमेदवाराचे नाव आहे.

मुक्ताईनगरजळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा जागेवर शिवसेनेचे चंद्रकांत पाटील (शिंदे) आणि राष्ट्रवादीच्या रोहिणी एकनाथ खडसे यांच्यात लढत आहे. या जागेसाठी रोहिणी पंडित खडसे आणि रोहिणी गोकुळ खडसे या दोन अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. विशेष म्हणजे, रोहिणी खडसे नावाच्या या दोन्ही महिला उमेदवारांपैकी एकही जळगाव जिल्ह्यातील नाही. एक रोहिणी वाशिम जिल्ह्यातील तर दुसरी अकोल्याची आहे. या जागेवर चंद्रकांत पाटील नावाचेही दोन अपक्ष रिंगणात आहेत.

कर्जत-जामखेडअहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभेच्या जागेवर भाजपचे राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्यात लढत आहे. शरद पवार यांच्या घराण्यातून आलेल्या रोहित पवारांच्या उमेदवारीमुळे ही लढत चर्चेत आहे. दरम्यान, कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे आणि रोहित पवार नावाच्या दोन अपक्षांनी अर्ज भरला आहे.

तासगाव-कवठे महाकाळसांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीत लढत आहे. राष्ट्रवादीकडून संजय काका पाटील आणि शरद पवार गटाकडून रोहित पाटील रिंगणात आहेत. तर, या जागेवर रोहित पाटील नावाच्या तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. तसेच, संजय पाटील नावाच्या व्यक्तीनेही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.

इस्लामपूर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने निशिकांत पाटील, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जयंत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवर निशिकांत पाटील आणि जयंत पाटील नावाचे प्रत्येकी दोन अपक्षही रिंगणात आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस