शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडून मनधरणी? रात्री २ वाजता खलबते; राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 11:03 IST

BJP Radhakrishna Vikhe Patil Meet Manoj Jarange Patil: पुन्हा एकदा महायुती सरकारला इशारा दिल्यानंतर लगेचच राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे.

BJP Radhakrishna Vikhe Patil Meet Manoj Jarange Patil: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. आचारसंहिता लागू होताच राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. या निवडणुकीत आरक्षणाचा विषय गेम चेंजर ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. यातच आचारसंहिता लागताच मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीला निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर भाजपा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. 

विधानसभा निवडणुकीत लढायचे की पाडायचे, याचा अंतिम निर्णय समाजाला विचारून घेतला जाणार आहे. त्यासाठी २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेदरम्यान राज्यातील मराठा समाजाची अंतरवाली सराटीत बैठक होणार आहे. तत्पूर्वी समाजाकडून अर्ज करणाऱ्या इच्छुकांशी चर्चा केली जाणार असल्याची माहिती मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिली. तसेच महामंडळांची घोषणा आणि योजना हा केवळ दिखावा आहे. १८ पगडजाती कोणासोबत आहेत, ते तुम्हाला लवकरच कळेल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. या घडामोडींमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेली मनोज जरांगे यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असल्याचे सांगितले जात आहे.

भाजपाकडून मनधरणी? रात्री २ वाजता खलबते

मध्यरात्री सुमारे २ वाजता भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरावली सराटीत भेट घेतली. या दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. विशेष म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांची आठ दिवसात दुसऱ्यांदा भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील मात्र गुलदस्त्यात असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मनोज जरांगे सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून बोचरी टीका करत आहेत. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून मनोज जरांगे पाटील यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत का, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात असल्याचे म्हटले जात आहे. 

दरम्यान, एकनाथ शिंदे हेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतील, असे आम्ही पूर्वीपासून म्हणत होतो; परंतु त्यांना कोणी काम करू दिले नाही, हे माहिती नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण मिळू दिले नाही. त्यांच्या डोक्यात वेगळे प्लॅनिंग होते. ते प्लॅनिंग आपण २० तारखेच्या बैठकीत सांगणार आहोत. भाजपाने रचलेले षड्यंत्र फेल करणार आहे. मराठ्यांना बेदखल करण्याचे काम फडणवीसांनी केले. मराठ्यांचे आयुष्य बेचिराख करण्याचे काम फडणवीसांनी केले. फडणवीसांनी सत्तेचा वापर मराठ्यांच्या विरोधात केला. मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचे नाही यासाठीच फडणवीसांनी सुरुवातीपासून खेळी केली. मराठा समाजाच्या पोरांना आरक्षण न देता भिकारी ठेवण्याचे काम त्यांनी केले. देवेंद्र फडणवीस द्वेषाने वागले. मराठ्यांच्या शेपटावर त्यांनी पाय ठेवला, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maratha Reservationमराठा आरक्षणRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील