शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

तुळजापूरला पर्यटनात वैश्विक पातळीवर नेऊ : अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 19:20 IST

शाह यांनी तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराच्या पर्यटनासंदर्भात मोठी घोषणा केली. भाजप उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांना विजयी करा, तुळजापूरच्या पर्यटनाला वैश्विक पातळीवर नेऊ, असंही शाह यांनी सांगितले. शाह यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

तुळजापूर - विधानसभा निवडणुकीत तुळजापूर मतदारसंघातून राणा जगजितसिंह पाटील यांना विजयी करा, असं आवाहन भारतीय जनता पक्षाने अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. यावेळी त्यांनी तुळजापूरला पर्यटन क्षेत्रात वैश्विक पातळीवर नेऊ, असं आश्वासन दिले. यावेळी मंत्री सुभाष देशमुख, तानाजी सावंत, सुजितसिंह ठाकूर उमेदवार राणा जगजितसिंह पाटील, राजा ओव्हाळ, दत्ता कुलकर्णी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शाह यांची प्रचारसभा तुळजापुरात आयोजित करण्यात आली होती.

यावेळी अमित शाह यांनी येथील दुष्काळ नष्ट करण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले. तसेच धनगर समाजाला 1000 कोटी देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.  दुष्काळ दूर व्हावा यासाठी लागणाऱ्या 21 टीएमसी पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येईल. तसेच सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग पूर्ण होईल, असंही त्यांनी सांगितले. मराठवाड्यातील दुष्काळ आणि पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची सोडविण्यासाठी  वॉटर ग्रीडच्या माध्यमातून काम करण्यात येईल, असंही शाह म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातील धनगर समाजाला एसटी प्रवर्गाच्या सुविधा देण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, असंही सांगितले.

यावेळी शाह यांनी तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराच्या पर्यटनासंदर्भात मोठी घोषणा केली. भाजप उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांना विजयी करा, तुळजापूरच्या पर्यटनाला वैश्विक पातळीवर नेऊ, असंही शाह यांनी सांगितले. शाह यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. 

 

टॅग्स :Ranajagjitsinha Patilराणा जगजितसिंह पाटीलAmit Shahअमित शाहBJPभाजपाtuljapur-acतुळजापूरAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019