शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Maharashtra Assembly Election 2019 : युती-आघाडीमुळे विस्थापितांची ‘छुपी’ लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 19:36 IST

Maharashtra Assembly Election 2019 : मागील निवडणुकीतील उमेदवारांच्या महत्त्वाकांक्षांना लगाम : युती-आघाडी धर्म सांभाळताना कसरत

धनंजय वाखारे

नाशिक : विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप महायुती आणि कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाल्याने अनेक इच्छुकांना आपल्या महत्त्वाकांक्षांना लगाम घालावा लागला. मागील 2014च्या निवडणुकीत शड्ड ठोकत परस्परांना आव्हान देणारे बहुतांशी उमेदवार आता रिंगणात नसले तरी मित्रपक्षांच्या व्यासपीठावर युती-आघाडीधर्म सांभाळताना दिसून येत आहे. यातील काही विस्थापितांची प्रस्थापितांविरोधी छुपी लढाई मात्र चालू आहे आणि त्याचे दृश्य परिणाम मतदानावर दिसून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मागील निवडणुकीत शिवसेना, भाजप, कॉँग्रेस, राष्ट्रवादी हे राजकीय पक्ष स्वतंत्रपणो लढले होते. त्यामुळे अनेक इच्छुकांना प्रत्यक्ष रणभूमीचा अनुभव घेता आला होता. यंदा महायुती आणि आघाडी झाल्याने युती-आघाडी तुटावी म्हणून पाण्यात देव बुडवून ठेवणा-यांची निराशा झाली आणि मागील निवडणुकीत ज्यांच्याविरोधात लढाई केली, त्यांचेच ङोंडे हाती घेण्याची वेळ आली. जिल्ह्यात 2014 च्या निवडणुकीत नांदगाव मतदारसंघात अद्वय हिरे यांनी भाजप, तर माजी आमदार अनिल आहेर यांनी कॉँग्रेसकडून उमेदवारी केली होती. परंतु, यंदा युती-आघाडीमुळे हे दोन्ही चेहरे रिंगणात नाहीत. त्यातच अद्वय हिरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अनिल आहेर यांनी यापूर्वीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरुद्ध नाराजीचा सूर लावलेला होता.

मालेगाव मध्य मतदारसंघात यंदा प्रथमच जनता दलाचा उमेदवार रिंगणात नाही. या मतदारसंघात वर्चस्व गाजविणारे दिवंगत माजी आमदार निहाल अहमद यांचे पुत्र बुलंद इक्बाल यांनी लढत दिली होती. परंतु, त्यांचे दुर्दैवी निधन झाल्यामुळे जनता दलाला उमेदवार मिळाला नाही.  मालेगाव बाह्य मतदारसंघात गेल्यावेळी शिवसेनेचे दादा भुसे यांच्याविरोधात भाजपचे पवन ठाकरे व राष्ट्रवादीचे सुनील गायकवाड यांनी निवडणूक लढविली होती. त्यातील गायकवाड हे आता भाजपवासी झाले आहेत. कळवण मतदारसंघात गेल्यावेळी राष्ट्रवादीकडून ए.टी. पवार आणि भाजपकडून यशवंत गवळी यांनी लढत दिली होती. त्यातील ए.टी. पवार यांचे निधन झाले आहे. चांदवड मतदारसंघात आता भाजपत असलेले आत्माराम कुंभार्डे हे अपक्ष लढले होते. आता ते भाजप उमेदवाराच्या व्यासपीठावर दिसत आहेत. याशिवाय, राष्ट्रवादीकडून उत्तम भालेराव आणि शिवसेनेकडून नितीन आहेर यांनी लढत दिली होती. यंदा मात्र हे उमेदवार रिंगणात नाहीत. त्यांची युती-आघाडीधर्म सांभाळताना कसरत होताना दिसून येत आहे.

येवला मतदारसंघात गेल्यावेळी भाजपकडून शिवाजी मानकर यांनी लढत दिली होती. तेही यंदा रिंगणात नाहीत. निफाडमधून भाजपकडून वैकुंठ पाटील लढले होते. त्यांनाही यंदा युतीमुळे इच्छेला मुरड घालावी लागली. दिंडोरीतून गेल्यावेळी माजी आमदार धनराज महाले हे शिवसेनेकडून, माजी आमदार रामदास चारोस्कर हे कॉँग्रेसकडून, माकपाकडून दत्तू पाडवी, तर मनसेकडून सुधाकर राऊत यांनी लढत दिली होती. यंदा हे चारही उमेदवार रिंगणात नाहीत. धनराज महाले यांचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला तर चारोस्करांनाही पक्षांतर फलदायी ठरले नाही. माकपाने तर उमेदवारच दिलेला नाही आणि मनसेचे राऊत यांनी विश्रंती घेणो पसंत केले. 

नाशिक पूर्वमधून शिवसेनेकडून चंद्रकांत लवटे, कॉँग्रेसकडून उद्धव निमसे, तर मनसेकडून रमेश धोंगडे यांनी लढत दिली होती. यंदा यापैकी कुणीही रिंगणात नाही. त्यातील निमसे यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे तर रमेश धोंगडे यांची घरवापसी झाली आहे. नाशिक मध्य मतदारसंघात गेल्यावेळी मनसेकडून माजी आमदार वसंत गिते, कॉँग्रेसकडून शाहू खैरे, शिवसेनेकडून अजय बोरस्ते, तर राष्ट्रवादीकडून विनायक खैरे यांनी लढत दिली होती. दरम्यान, वसंत गिते यांनी भाजपची वाट धरली. मात्र, यंदा त्यांचे बंड शमविण्यात यश आले. शाहू खैरे यांना कॉँग्रेसने उमेदवारी जाहीर करूनही त्यांनी रणभूमीत न उतरण्याचा सुज्ञपणा दाखविला. अजय बोरस्ते हे युतीधर्म कितपत सांभाळतात हे पाहणो औत्सुक्याचे ठरेल. 

नाशिक पश्चिममधून गेल्यावेळी राष्ट्रवादीकडून नगरसेवक शिवाजी चुंभळे, तर कॉँग्रेसकडून दशरथ पाटील आणि शिवसेनेकडून सुधाकर बडगुजर यांनी लढत दिली होती. यंदा मात्र, हे तीनही उमेदवार रिंगणात नाहीत. शिवाजी चुंभळे हे लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात अडकले तर दशरथ पाटील यांनी विश्रंती घेणो पसंत केले. बडगुजर यांनी भाजप उमेदवाराविरोधात दंड थोपटले; परंतु नंतर माघार घेत पक्षातीलच बंडखोर उमेदवाराच्या बाजूने बळ उभे केल्याचे चित्र आहे. देवळाली मतदारसंघातून भाजपकडून रामदास सदाफुले, राष्ट्रवादीकडून नितीन मोहिते, मनसेकडून प्रताप मेहरोलिया आणि कॉँग्रेसकडून गणोश उन्हवणो यांनी उमेदवारी केली होती. यंदा मात्र, गणोश उन्हवणो यांनी देवळालीऐवजी नाशिक पूर्वमधून आघाडीकडून उमेदवारी मिळविली तर अन्य एकही रिंगणात नाही. 

इगतपुरी मतदारसंघात गेल्यावेळी माजी आमदार शिवराम झोले हे शिवसेनेकडून, काशीनाथ मेंगाळ हे अपक्ष, तर चंद्रकांत खाडे यांनी भाजपकडून उमेदवारी केली होती. यंदा विद्यमान आमदाराच्या पक्षांतरामुळे इच्छुक असलेल्या झोले-मेंगाळ यांचा हिरमोड झाला आणि दोहोंवर युतीधर्म पाळण्याची वेळ आली. परंतु, वरवर युतीधर्माची पाठराखण केली जात असली तरी आतून मात्र नाराजीचा ज्वालामुखी धगधगता असल्याने त्याचा स्फोट प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी दिसून येण्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. 

मागील निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकलेले राजकीय पक्षांचे उमेदवार युती-आघाडीमुळे विस्थापित झाले खरे; परंतु त्यांचा प्रस्थापितांना अथवा नव्या चेह-यांना लाभ होतो की दगाफटका बसतो, याची उत्सुकता मात्र वाढली आहे. 

टॅग्स :NashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्रAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019PoliticsराजकारणBJPभाजपाShiv Senaशिवसेना