Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणाचे विधानसभेत पडसाद; विरोधकांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 13:54 IST2026-03-23T13:53:14+5:302026-03-23T13:54:15+5:30

CM Devendra Fadnavis on Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कर्तृत्वाचे पडसाद आज राज्याच्या विधानसभेत जोरदार उमटले.

Maharashtra Assembly: CM Devendra Fadnavis on Ashok Kharat Case | Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणाचे विधानसभेत पडसाद; विरोधकांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणाचे विधानसभेत पडसाद; विरोधकांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कर्तृत्वाचे पडसाद आज राज्याच्या विधानसभेत जोरदार उमटले. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरत आक्रमक पवित्रा घेतला. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, खरात याने महिलांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतल्याचे स्पष्ट केले. तसेच, या प्रकरणावर उद्या सभागृहात सविस्तर निवेदन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

सभागृहात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "अशोक खरात याने आपल्या कथित शक्तींचा दुरुपयोग करून आणि महिलांची दिशाभूल करून त्यांच्यासोबत गैरवर्तन व दुष्कृत्य केल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, हा केवळ राजकारणाचा विषय नसून महिलांच्या सन्मानाचा प्रश्न आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी याचे गांभीर्य ओळखावे." 

मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या भूमिकेचे कौतुक करताना काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. ते म्हणाले की, "खरात याने परदेशात पळून जाऊ नये, यासाठी पोलिसांनी अटकेच्या १० दिवस आधीच दुसऱ्या जिल्ह्यातील एका तक्रारीचा आधार घेत एलओसी काढून ठेवली. पीडित महिला सुरुवातीला तक्रार देण्यासाठी समोर येत नव्हत्या. मात्र, पोलिसांनी त्यांना योग्य तो विश्वास आणि धीर दिल्यानंतर काही महिलांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. या प्रकरणात आणखीही काही महिला तक्रार करण्याची शक्यता असून सध्या कसून चौकशी सुरू आहे."

"अशोक खरात प्रकरणाची चौकशी सखोल सुरू आहे. पोलिसांनी अत्यंत प्रो-ॲक्टिव्ह पद्धतीने काम करून आरोपीला जाळ्यात अडकवले आहे. यासंदर्भातील सर्व माहिती संकलित करून मी उद्या सभागृहाला अवगत करेन", असेही मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणातील अधिक खुलासे उद्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर समोर येतील, ज्यामुळे खरातचे आणखी किती कारनामे उघड होतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : अशोक खरात मामला विधानसभा में गूंजा; मुख्यमंत्री फडणवीस ने विपक्ष को जवाब दिया

Web Summary : अशोक खरात घोटाला विधानसभा में गूंजा। मुख्यमंत्री फडणवीस ने महिलाओं के शोषण को स्वीकार किया और विस्तृत बयान का वादा किया। उन्होंने पुलिस की सक्रियता की सराहना की, खुलासा किया कि गिरफ्तारी से पहले एलओसी जारी किया गया था। गहन जांच जारी है, और अधिक खुलासे की उम्मीद है।

Web Title : Ashok Kharat Case Echoes in Assembly; CM Fadnavis Responds to Opposition

Web Summary : The Ashok Kharat scandal reverberated in the Assembly. CM Fadnavis acknowledged the exploitation of women and promised a detailed statement. He praised police proactiveness, revealing an LOC was issued before the arrest. A thorough investigation is ongoing, with more revelations expected.