शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, पण.…’’ अजित पवार यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 15:18 IST

Ladki Bhain Yojana : गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या विजयात गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत सध्या कमालीची अनिश्चितता निर्माण झालेली दिसत आहे. (Maharashtra Assembly Budget Session 2025) त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी या योजनेबाबत मोठं विधान केलं आहे.

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या विजयात गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत सध्या कमालीची अनिश्चितता निर्माण झालेली दिसत आहे. एकीकडे नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पामधून या योजनेसाठी आर्थिक तरतूद करताना वित्तमंत्री अजित पवार यांनी हात आखडता घेतला होता. त्यामुळे लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपयांऐवजी १५०० रुपयांवरच समाधान मानावे लागणार असल्याचं स्पष्ट झालंय. तर दुसरीकडे सरकार ही योजना लवकरच गुंडाळेल, असे दावे विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेतून लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, पण या योजनेत दुरुस्ती केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

विधानसभेत लाडकी बहीण योजनेवर बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, लाडक्या बहिणींना आतापर्यंत दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत. आम्ही कुठल्याही महिला भगिनीला दिलेले पैसे परत घेणार नाही. ही योजना आम्ही चालू ठेवणार आहोत. तसेच या योजनेला जो निधी लागणार आहे, तो देणार आहोत. मात्र ही योजना गरीब घटकातील महिलांसाठी आहे, हे मी या सभागृहाच्या माध्यमातून  सर्वांना सांगू इच्छितो.

अजित पवार पुढे म्हणाले की, कधी कधी योजना येते. मात्र त्यातील काही गोष्टी लक्षात आल्यानंतर आपण दुरुस्ती करतो. आम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये दुरुस्ती करणार आहोत. ही योजना बंद करणार नाही. त्याच्यामध्ये कुठल्याही गरीब महिलेवर अन्याय करणार नाही. ज्यांना गरज आहे. त्यांना १०० टक्के मदत देणारच. त्यामध्ये आम्ही तसूभरही कमी पडणार नाही, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.      

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाAjit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार