शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत महाविकास आघाडीची बैठक, प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित, जागावाटपावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 15:34 IST

आजची बैठक यशस्वी होणार का? याकडे राजकीय वर्तुळातील लोकांचे लक्ष लागले आहे.

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपासंदर्भात अद्याप महाविकास आघाडीमध्ये एकमत झालेले नाही. याच पार्श्वभूमीवर आज (२ फेब्रुवारी) महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होणार? आजची बैठक यशस्वी होणार का? याकडे राजकीय वर्तुळातील लोकांचे लक्ष लागले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज मुंबईत महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित आहेत,  अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली आहे. तसेच, सत्ताधाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या लढ्याला मजबूत करण्यासाठी महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

वंचित बहुजन आघाडीला अखेर महाविकास आघाडीत स्थान देण्यात आले आहे. वंचितला आघाडीत सामील करून घेण्याबाबत शिवसेना, राष्ट्रवादी आधीच सकारात्मक होते, गेल्या मंगळवारच्या बैठकीत काँग्रेसकडूनही याला संमती मिळाल्यानंतर याविषयीचे पत्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पाठविण्यात आले आहे. वंचितने सामील व्हावे  यासाठी तिन्ही पक्षांचे एकमत झाले असून त्यानुसार महाविकास आघाडीत समावेश करण्यात येत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुका पुढील काही दिवसांत होणार असल्याने सत्ताधारी एनडीए आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीत जागावाटपाबद्दल खल सुरू आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून विरोधक या निवडणुकांना सामोरे जाणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर महाविकास आघाडी कमजोर झाल्याचे दिसत असले तरी आगामी निवडणुकीच्या रणांगणात संपूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्धार दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून लोकसभेच्या ४८ जागांपैकी ३४ जागांचा तिढा जवळपास सुटला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र उर्वरित १४ जागा मविआतून कोणते पक्ष लढणार, याबाबत अजूनही रस्सीखेच सुरू आहे. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना