शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आरेतील मेट्रो-३ कार्यालयाची मनसेकडून तोडफोड

By admin | Updated: March 11, 2015 02:32 IST

गोरेगाव येथील आरे वसाहतीमधील प्रस्तावित मेट्रो-३ प्रकल्पाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध दर्शवताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळी

मुंबई : गोरेगाव येथील आरे वसाहतीमधील प्रस्तावित मेट्रो-३ प्रकल्पाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध दर्शवताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मेट्रो-३ कार्यालयाची तोडफोड केली. त्यामुळे परिसरात काहीकाळ तणावाचे वातारण निर्माण झाले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात आरे सब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मेट्रो प्रकल्पाला स्थानिकांकडून विरोध तीव्र होताच राजकीय पक्षांनीही यामध्ये उडी घेतली आहे. शिवसेना, भाजपा, मनसे यांनीही आरेतील वृक्षतोडीला विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी मनसेने काही दिवसांपूर्वी आरे वसाहतीमध्ये आंदोलनही केले होते. सोमवारी मनसेच्या ९व्या वर्धापन दिनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. ठाकरे यांच्या विरोधाला काही तास उलटत नाहीत, तोच मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमधून (क्रमांक-१३००) आलेल्या नऊ ते दहा तरुणांनी आरे वसाहतीमधील पिकनिक पॉइंटजवळील प्रस्तावित मेट्रो-३ प्रकल्पाच्या एस.के. कन्स्ट्रक्शनच्या कंटेनर कार्यालयावर जोरदार दगडफेक केली. यामध्ये कार्यालयाच्या काचा फुटल्या आहेत.फोडफोड केल्यानंतर तरुणांनी कार्यालयाचा सुरक्षारक्षक रवींद्र डुगज यांना मारहाण केली. या प्रकारानंतर तरुणांनी मेट्रो कार्यालयावर मनसेचे दोन झेंडे लाऊन इनोव्हा कारमधून गोरेगावच्या दिशेने पलायन केले. त्यांनी मद्यप्राशन केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी आरे सब पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)