शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

आंदोलनकर्त्या कर्णबधीर विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला माया पाडळे यांनी केली चहाची सोय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 6:57 PM

पुण्यात सकाळपासून कर्णबधिर विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. पुण्यातील समाजकल्याण कार्यालयाजवळ हे आंदोलक आले असताना, पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज केला.

- राहुल गायकवाडपुणे - पुण्यात सकाळपासून कर्णबधिर विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. पुण्यातील समाजकल्याण कार्यालयाजवळ हे आंदोलक आले असताना, पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यावेळी अनेक आंदोलक जखमी झाले. आपल्या मागण्यांवर आंदोलक ठाम होते. संध्याकाळपर्यंत आंदोलक समाजकल्याण कार्यालयाजवळ बसून होते. आजूबाजूला पाण्याची आणि खाण्याची कुठलीही सोय नव्हती. संध्याकाळपर्यंत हे आंदोलक भुकेले होते. त्यांची अवस्था पाहून येथे राहणाऱ्या माया पाडळे यांनी या आंदोलकांसाठी चहाची सोय केली. तसेच या आंदोलकांना फळे आणि इतर खाण्याचे पदार्थ दिले. 

कर्णबधिर विद्यार्थ्यांनी पुण्यातील समाजकल्याण कार्यालयावर मोर्चा काढला, पुढे हे आंदोलक आपल्या मागण्या घेऊन मुंबईला जाणार होते. आंदोलकांकडे ठिय्या आंदोलन करण्याची परवानगी होती परंतु मोर्चा काढण्याची परवानगी नसल्याचे सांगत पोलिसांनी हा मोर्चा समाजकल्याण कार्यालयाच्या अलीकडेच अडवला. यावेळी मोर्चेकऱ्यांना अडवण्यासाठी पोलिसांनी बॅरिगेट लावले होते, आंदोलकांचे नेते मोरे यांनी हातवारे करून आंदोलकांना चिथावल्याचे बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुजावर यांचे म्हणणे होते. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज मध्ये काही आंदोलक जखमी झाले. 

दरम्यान आंदोलकांनी त्याच जागी ठिय्या मांडला. संध्याकाळपर्यंत आंदोलन सुरू असल्याने अनेकांना भूक लागली होती. जवळ पाण्याची, चहाची कुठलीही सोय नव्हती. या आंदोलकांची अवस्था पाहून येथे राहणाऱ्या माया पाडळे यांनी त्यांच्यासाठी चहा केला. तसेच खाण्यासाठी फळे आणि इतर पदार्थ दिले. आंदोलकांनी सुद्धा त्यांचे मनापासून आभार मानले. प्रशासनाला या आंदोलकांचा आवाज ऐकू गेला नसला तरी सामान्य नागरिक असलेल्या माया यांनी माणुसकी दाखवून दिली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र