लुडो हा खेळ कौशल्याचा की संधीचा?, उच्च न्यायालयाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 06:05 IST2021-06-06T06:05:14+5:302021-06-06T06:05:55+5:30

Ludo : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी केशव मुळ्ये यांनी लुडो सुप्रीम हे मोबाइल ॲप तयार करणाऱ्या कॅशग्राईल प्रा.लि.वर गुन्हा नोंदवण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे.

Ludo is a game of skill or opportunity ?, High Court question | लुडो हा खेळ कौशल्याचा की संधीचा?, उच्च न्यायालयाचा सवाल

लुडो हा खेळ कौशल्याचा की संधीचा?, उच्च न्यायालयाचा सवाल

मुंबई : लुडो हा कौशल्याचा खेळ नसून संधीचा खेळ आहे. ऑनलाइन लुडो हा एक प्रकारचा जुगार आहे, असा दावा करणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी केशव मुळ्ये यांनी लुडो सुप्रीम हे मोबाइल ॲप तयार करणाऱ्या कॅशग्राईल प्रा.लि.वर गुन्हा नोंदवण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे. ही कंपनी जुगाराला प्रोत्साहन देत असल्याचा त्यांचा आरोप आहे. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक (एमपीजी) अधिनियमातील तरतुदी या खेळासाठी लागू होतात. तीन वर्षांची मुलेही हा खेळ जिंकू शकतात. त्यामुळे ताे कौशल्याचा नसून संधीचा खेळ आहे, असे याचिकेत म्हटले आहे.
कंपनीवर गुन्हा नोंदवण्यासाठी मुळ्ये यांनी गिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली; परंतु पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी सीआरपीसीअंतर्गत अतिरिक्त मुख्य दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आणि याबाबत तपास करण्याचे आदेश पोलिसांना द्यावे, अशी मागणी केली. 
मात्र, दंडाधिकारी न्यायालयाने लुडो 
हा खेळ कौशल्याचा असून 
संधीचा नाही, असे स्पष्ट केले. दंडाधिकारी न्यायालयाच्या या निर्णयाला मुळ्ये यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.
हा खेळ खेळाडू पैशाची पैज लावून खेळू शकतो. मोबाइलवर हा 
खेळ खेळताना प्रवेश फी भरावी 
लागते. त्यानंतर जो खेळाडू हा 
खेळ जिंकतो त्याला अन्य खेळाडूंनी प्रवेश फी म्हणून भरलेली 
रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते. 
ती रक्कम जिंकणाऱ्या खेळाडूच्या 
ई-वॉलेटमध्ये जमा करण्यात 
येते. त्यामुळे हा एक प्रकारे जुगार 
आहे, असे याचिकेत नमूद  करण्यात आले आहे.

Web Title: Ludo is a game of skill or opportunity ?, High Court question