शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वाश्रमीच्या प्रेयसीच्या हल्ल्यात प्रियकराच्या भावाचा मृत्यू

By admin | Updated: September 26, 2016 03:02 IST

अनेक वर्षांपासूनचे प्रेमसंबंध तोडल्याने संतापलेल्या विवाहित प्रेयसीने पूर्वाश्रमीच्या विवाहित प्रियकरावर घरी जाऊन हल्ला केला.

संगमनेर (जि. अहमदनगर) : अनेक वर्षांपासूनचे प्रेमसंबंध तोडल्याने संतापलेल्या विवाहित प्रेयसीने पूर्वाश्रमीच्या विवाहित प्रियकरावर घरी जाऊन हल्ला केला. या वेळी मध्यस्थी करणाऱ्या प्रियकराच्या भावाला जीव गमवावा लागला. शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास शहरातील जनतानगरमध्ये हा थरारक प्रकार घडला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. शहरालगतच्या लक्ष्मीनगर येथे राहणाऱ्या मीना शिवाजी सोनवणे हिचे राजेंद्र चंद्रकांत झांबरे (३०, रा. जनतानगर) याच्याशी गेल्या ४ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र झांबरेने ६ महिन्यांपूर्वी हे प्रेमसंबंध तोडले होते. याचा राग मनात धरून मीना शनिवारी रात्री आपला मुलगा सोनू, सुशीला विलास देवकर व इतर दोघांना बरोबर घेऊन राजेंद्र याच्या घरी गेली. तेथे त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्या वेळी राजेंद्रचा भाऊ रमाकांत (२५) भांडण सोडविण्यासाठी गेला. मीना व इतरांनी त्यालाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्या डोक्यात कुकर घातला. त्यात घाव वर्मी बसल्याने रमाकांतचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी मीना शिवाजी सोनवणे, सोनू शिवाजी सोनवणे (दोघे रा. लक्ष्मीनगर), सुशीला विलास देवकर (रा. घुलेवाडी) व अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून रविवारी यातील तिघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)