शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आपत्कालीन प्रशिक्षणालाच खो

By admin | Updated: August 5, 2016 00:28 IST

शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी पोलिसांना दिले होते.

पुणे : राज्यामध्ये येऊ शकणाऱ्या आपत्तींचा सामना कसा करावा, यासाठी पोलिसांनी शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी पोलिसांना दिले होते. पुणे पोलिसांनी मात्र महासंचालकांच्या या आदेशाला गांभीर्याने घेतलेले नसून, पोलीस ठाण्यांकडून त्याबाबत एकही सत्र घेण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाबाबत पोलीसही उदासीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. तत्कालीन पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी चार महिन्यांपूर्वी एक आदेश जारी करून राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या हद्दीतील शाळा-महाविद्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्याचे आदेश दिले होते. यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासन आणि अग्निशामक दलाची मदत घेऊन पूर, आग, पडझड, वादळ आदी आपत्तींमध्ये नेमके काय करावे, बचाव कार्य कसे करावे, वैद्यकीय मदत कशी उभरावी यांसह काही महत्त्वाच्या बाबींचे प्रशिक्षण देण्याचे स्पष्ट करण्यात आले होते. पोलीस महासंचालक कार्यालयाने तसे पत्र सर्व पोलीस आस्थापनांना पाठविले होते. पुणे पोलिसांना हा आदेश मिळताच सर्व पोलीस ठाण्यांना या संदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच पोलीस ठाण्यांनी आयोजित केलेल्या प्रशिक्षण सत्रांची माहिती विशेष शाखेला पाठविण्याच्याही सूचना करण्यात आलेल्या होत्या. मात्र, हा सर्व सोपस्कार कागदोपत्रीच राहिला. कोणत्याही पोलीस ठाण्यांनी या संदर्भात गांभीर्य दाखविले नाही. पोलीस ठाणे स्तरावर असलेली उदासीनता या उपक्रमाच्या आडवी आली आहे. शालेय विद्यार्थी कोणाचा जीव जरी नाही वाचवू शकले, तरी स्वत:चे तरी आपत्तीमधून रक्षण करतील, असे प्रशिक्षण त्यांना मिळाले असते. >प्रशिक्षणच नाहीपुण्यात नेहमी झाडपडी, जुन्या वाड्याच्या भिंती पडणे, इमारतीचे स्लॅब कोसळणे, पावसाळ्यात तर नदीपात्र दुथडी भरुन वाहत असते. अशा वेळी स्थानिक पातळीवर शासकीय यंत्रणांना प्रशिक्षित तरुणांची मदत मिळू शकते.परंतु, उत्साहाचाच दुष्काळ असलेल्या पोलीस ठाण्यांनी पोलीस महासंचालकांचा हा आदेश गांभीर्याने घेतलाच नाही. गेल्या चार-सहा महिन्यांत कोणत्याही शाळा-महाविद्यालयात पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेच नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.